Home /News /entertainment /

'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा बदला अंदाज! चेहऱ्यावरचं हास्य पाहून चाहत्यांना झाला आनंद

'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा बदला अंदाज! चेहऱ्यावरचं हास्य पाहून चाहत्यांना झाला आनंद

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. मधुराणीने नुकताच एक व्हिडओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खर तर अरुंधतीशी संबंधीत आहे.

  मुंबई, 20 जानेवारी - स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिका (Aai Kuthe Kay Karate)   टीआरपीच्या रेसमध्ये नेहमी सर्वात पुढे असते. मालिकेतील नवनवीन ट्वीस्ट आणि टर्न यामुळे मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेतील अरुंधतीची (Arundhati). भूमिका प्रेक्षकांच्या आवडती आहे. अरुंधतीची भूमिका मालिकेत मधुराणी प्रभुलकर    (Madhurani Prabhulkar)  साकारत आहे. मधुराणीने नुकताच एक व्हिडओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खर तर अरुंधतीशी संबंधीत आहे. मधुराणी प्रभुलकरण एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती अरुंधतीच्या लुकमध्ये दिसत आहे. सोबत तिनं दोनओळींची मात्र बोलकी कॅप्शन शेअर केली आहे. जी कुठेतरी अरुंधतीशी मेळ घालते. तिनं म्हटलं आहे की,🕊️ ख्वाबोके परिंदे......!!!! यामध्ये अरुंधती मोकळ्या आकाशाखाली मस्त पक्षांच्या थाव्यात पक्षांप्रमाणे मनमोकळी बाघडताना दिसते आहे. अनिरुद्ध पासून घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधतीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. मात्र तिनं त्याचा धैर्याने सामना केला. पहिली अरुंधती जी प्रेत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून होती, ती आता स्वत:च्या पायावर खंबीर उभी राहिली आहे. आता ती तिचा आवज बनली आहे. काहीसा मोकळा श्वास घेताना दिसते. हा बदल मागच्या काही भांगामध्ये पाहायला मिळतो आहे. चाहत्यांना देखील अरुंधतीला असं खळखळून हासताना पाहून आनंद होत आहे.
  आता अभि आणि अनघाचे लग्न झाले आहे. यानंतर तिनं एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होते, नवीन सूनबाई आल्या...आता निघायची वेळ झाली. त्यामुळे अनघाच्या येण्यामुळं अरुंधती कुठेतरी चिंतामुक्त झाली आहे. देशमुख कुटुंबाला तिच्यासारखं हक्काचे माणूस मिळाल आहे. कदाचित आता ती तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात करताना दिसेल...हेच यावरून स्पष्ट होते..त्यामुळे अरुंधतीचा हा व्हिडिओ मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. याचा उलगडा मात्र येणाऱ्या काळातच होणार आहे. वाचा-माझी तुझी रेशीमगाठ फेम अभिनेत्रीचे क्यूटनेस ओव्हरलोड फोटो पाहिले का? काही भूमिका या कलाकाराला लोकप्रियता देतात त्याप्रमाणे जगायला देखील शिकवतात. अरुंधतीच्या भूमिकेने मधुराणीला लोकप्रियता दिली. यासोबतच अरुंधती ही ओळख दिली. आज अरुंधती तिनं घेतलेल्या निर्णयामुळे कितीतरी महिलांसमोर आदर्श बनली आहे. कधीकधी बंधनात जगण्यापेक्षा मनाचं ऐकून कठोर निर्णय घ्यावे लागतात. प्रसंगी यासाठी विरोध पत्कारावा लागतो. मात्र हे निर्णय आयुष्याला दिशा देणारे असतात. अरुंधतीच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या