मुंबई, 20 जानेवारी - माझी तुझी रेशीमागाठ ( mazi tuzi reshimgathi ) फेम अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो तिच्या बालपणीचे आहेत. तिच्या बहिणीसोबत तिनं फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो पाहुन तुम्हाला या अभिनेत्रीला ओळखणं काहीसं अवघड होईल. पण तिचा हा क्युटनेसपणा चाहत्यांना मात्र खूप आवडला आहे. जितकी ती आता सुंदर दिसते तितकीच ती बालपणी क्यूट दिसत असल्याचे या फोटोतून दिसून येते.
माझी तुझी रेशीमागाठ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिनं नुकतेच तिच्या बालपणीचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. बहिणीसोबत तिनं हे फोटो शेअर करत सिस्टर लव्ह असं देखील म्हटलं आहे. या फोटोत प्रार्थना खूपच क्यूट दिसत आहे. आताची प्रार्थना आणि बालपणीचे प्रार्थना ओळखणे देखील अवघड होते. मात्र तिचे हे फोटो क्यूटनेस ओव्हरलोड असेच आहेत. चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत.
View this post on Instagram
प्रार्थना बेहेरे सध्या झी मराठीच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहची भूमिका साकारत आहे. या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. आता मालिका एक वेगळ्या वळणावर आहे. नेहाला यशचे सत्य समजले आहे. त्यामुळे नेहा आणि यशच्या मैत्रित दुरावा आला आहे. मात्र यश पुन्हा तिचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
वाचा-'मुलगी झाली हो'च्या सेटवर दाखल झाली संभाजी ब्रिगेड ; शुटिंग बंद पाडत...
प्रार्थनाने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘फुगे’, ‘व्हाट्सअँप लग्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. यासोबत हिंदी मालिकाविश्वात देखील प्रार्थनाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Prarthana Behere, Zee marathi serial