मुंबई, 6 मार्च- स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सततच्या ट्वीस्टमुळे चर्चेत असते. मालिकेत सध्या अरुंधतीचं आयुष्य एका नव्या वळणावर आहे. चारित्र्याच्या संशयावरून देशमुखांनी अरुंधतीला घरातून बाहेर काढलं आहे. मित्र आशुतोषच्या मदतीनं अरुंधतीला तिच्या हक्काचं घर मिळालं देखील आहे. या घरात ती राहायला गेली असली तरी संजना काय तिची पाठ सोडायला तयार नाही. कारण या घरासोबत संजनाचं खास कनेक्शन आहे. अरुंधतीचं घर जरी भाड्याचे असले तरी अरुंधतीला इथं खऱ्या अर्थाने मनाप्रमाणे जगता येणार आहे, शिवाय तिच्या स्वप्नांना आकार देता येणार आहे. मात्र अरुंधतीचं हे नवीन घर यापूर्वी संजनाचं होतं हे अद्याप कुणाच्या लक्षात आलेले नाही. मात्र नेटकऱ्यांनी मात्र हे लगेच ओळखलं आहे. वाचा- VIDEO : यामी गौतम कॅमेऱ्यासमोर हातानं लपवताना दिसली Oops Moment एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, अरुंधतीचं नवीन घर आहे तेच यापूर्वी संजनाचं घर होत. घरातील सेट सेम आहे फक्त इंटेरियर बदलण्यात आलं आहे. यापूर्वी संजना या घरात राहत होती. आता या घरात अरुंधती राहत आहे. नेटकऱ्यांनी देखील यातील फरक लगेच ओळखला आहे. त्यामुळे या मालिकेची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे.
अरुंधतीला हक्काचं घर मिळालं आहे. या घरातून तिला कोणीही बाहेर काढू शकणार नाही. ज्या देशमुखांच्या घरावर तिनं मनापासून प्रेम केलं त्यांनी तिला घरातून बाहेर काढलं. शिवाय चारित्र्यावर देखील संशय घेण्यात आला.