जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आप्पांनी चक्क आशुतोषला अरुंधतीसोबत लग्न करण्याची केली विनंती, 'आई कुठे काय करते'मध्ये मोठं वळण

आप्पांनी चक्क आशुतोषला अरुंधतीसोबत लग्न करण्याची केली विनंती, 'आई कुठे काय करते'मध्ये मोठं वळण

आप्पांनी चक्क आशुतोषला अरुंधतीसोबत लग्न करण्याची केली विनंती, 'आई कुठे काय करते'मध्ये मोठं वळण

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत एका मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा फारच उत्सुक झाले आहेत. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 एप्रिल- ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत एका मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा फारच उत्सुक झाले आहेत. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आप्पांनी चक्क आशुतोषला   (Ashutosh)  अरुंधतीसोबत  (Arundhati)  लग्न करण्याची मागणी घातली आहे. हा परमो समोर येताच चाहते हा एपिसोड पाहण्यासाठी फारच आतुर झाले आहेत. स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका पाहताना उत्सुकता वाटते. दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्धचे वडील असणारे आप्पा अर्थातच अरुंधतीचे सासरे आशुतोषसोबत दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी आशुतोषकडे अरुंधतीसाठी लग्नाची मागणी केली आहे. या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आपल्या आईला म्हणतो तू जा आणि आप्पाना घेऊन ये. आणि जर ते येत नसतील तर तूसुद्धा निघून जा. यावेळी अरुंधतीसह घरातील सर्वच लोक चकित होतात. त्यांनतर अरुंधती आप्पानां घेण्यासाठी जाते. तेव्हा आप्पा आशुतोषजवळ आपल्या मुलीशी अर्थातच अरुंधतीसोबत लग्न करण्याची विनंती करत असतात. आप्पाचं बोलणं ऐकून आशुतोषसुद्धा गोंधळला दिसून येत आहे.

जाहिरात

मालिकेत आलेल्या या अचानक ट्विस्टने मालिका कोणत्या नव्या वळणावर पोहोचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आशुतोष तर सुरुवातीपासूनच अरुंधतीवर प्रेम करतो. मात्र अरुंधती आजही अनिरुद्धवरच प्रेम करते. परंतु आप्पांच्या या निर्णयानंतर अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात