मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aaditi Pohankar Exclusive: बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या आदितीला मराठीत 'या' दिग्दर्शकाबरोबर करायचंय काम

Aaditi Pohankar Exclusive: बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या आदितीला मराठीत 'या' दिग्दर्शकाबरोबर करायचंय काम

मराठमोळी आदिती पोहनकर सध्या नेटफ्लिक्सच्या सिरीजचा महत्त्वाचा भाग झाली असून तिचं नाव सध्या सगळीकडे कौतुकाने घेतलं जात आहे.. तिच्या खास मुलाखतीत News18 लोकमतशी बोलताना तिने तिच्या मराठीतील कमबॅकबद्दल खूप छान मत मांडलं आहे.

मराठमोळी आदिती पोहनकर सध्या नेटफ्लिक्सच्या सिरीजचा महत्त्वाचा भाग झाली असून तिचं नाव सध्या सगळीकडे कौतुकाने घेतलं जात आहे.. तिच्या खास मुलाखतीत News18 लोकमतशी बोलताना तिने तिच्या मराठीतील कमबॅकबद्दल खूप छान मत मांडलं आहे.

मराठमोळी आदिती पोहनकर सध्या नेटफ्लिक्सच्या सिरीजचा महत्त्वाचा भाग झाली असून तिचं नाव सध्या सगळीकडे कौतुकाने घेतलं जात आहे.. तिच्या खास मुलाखतीत News18 लोकमतशी बोलताना तिने तिच्या मराठीतील कमबॅकबद्दल खूप छान मत मांडलं आहे.

मुंबई 2 जुलै: सध्या नेटफ्लिक्सच्या एका सिरीजची तुफान चर्चा होताना दिसते ती (She season 2) म्हणजे She सिझन 2. या सिरीजसोबत चर्चा होतेय या सिरीजमध्ये खणखणीत भूमिका साकारलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची. (Aaditi Pohankar) आदिती पोहनकर हे नाव तर ऐकलं असेलच! रितेश देशमुखच्या लई भारी चित्रपटात झळकल्यानंतर (Aaditi Pohankar in Lai Bhari) अदितीने बॉलिवूडचा रस्ता पकडला, किंबहुना बॉलिवूडनेच आदितीला शोधून काढलं असं म्हणावं लागेल. अदिती आता पुन्हा मराठीकडे कधी वळणार आहे याबद्दल आणि अनेक गोष्टींबद्दल आदिती News18 लोकमतला दिलेल्या exclusive मुलाखतीत बोलताना दिसली.

आदितीने निशिकांत कामतच्या लई भारी चित्रपटातून दमदार एंट्री केली होती. सध्या तिने नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये केलेलं काम फारच पसंत केलं जात आहे. हा या वेबसिरीजचा दुसरा सिझन असून यातील भूमिका परदेशी ही एका पावरफुल आणि खंबीर स्वरूपात पाहायला मिळाली आहे. मिडलक्लास भूमीचं आयुष्य एका गँगस्टरच्या येण्याने कसं बदलतं हे या सिरीजमध्ये बघताना थरारक वाटतं. आदिती हिंदीमध्ये काम करत असली तरी तिची मराठीशी असलेली नाळ तशीच आहे.

अदितीला मराठीतील कमबॅक बद्दल (Aaditi Pohankar Marathi comeback) विचारल्यावर ती म्हणते, “कमबॅक करायला मी कुठे गेलेच नाहीये, मी इथेच आहे. मला नागराज मंजुळेंसोबत काम करायची मनापासून इच्छा आहे. त्यांच्या कामाने मी प्रभावित झालेय. एखादी मस्त स्क्रिप्ट असेल तर त्यांच्यासोबत करायला मज्जा येईल. मला ते एक दिग्दर्शक म्हणून फार आवडतात.”

आदितीने खूप कमी काळात तिची प्रभावशाली शैली दाखवून दिली आहे. तिच्या भूमी या पात्रासाठी भाषेपासून ऍसेन्ट पर्यंत अनेक गोष्टीवर तिने मेहनत घेतली. तिला या पत्राने काय शिकवलं याबद्दल ती सांगते, “मी माझ्या पात्राकडून म्हणजे भूमीकडून हे शिकले की कोणत्याही गोष्टीचं जास्त प्लॅनिंग करू नये. जसं भूमी सिरीजमध्ये म्हणते की मेरेको जो ठीक लागत में कर डालती हुं और बाद मे शिवचती मै क्या की तसंच मी हळूहळू करायचा प्रयत्न करतेय. खूप प्लॅनिंग केलं की फक्त गोंधळ वाढतो. त्यापेक्षा त्या त्या वेळी योग्य निर्णय घेणं जास्त सोपं आणि कमी त्रासदायक आहे”

हे ही वाचा- Aaditi Pohankar exclusive: शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?

 She मधील भूमिका परदेशी हे पात्र साकारणं तिच्यासाठी खूपच अवघड होतं पण तिने ते साकार करून दाखवलं आहे. आज नेटफ्लिक्सवरील ही सिरीज ग्लोबल टॉप 10 सिरीजमध्ये गणली जात आहे. भूमिका परदेशीचा हा प्रवास लोकांना फारच भावतो आहे.

First published:

Tags: Marathi actress, Nagraj manjule, Netflix