मुंबई, 09 सप्टेंबर : आजकाल गणेशोत्सव आपण अतिशय उत्साहात साजरा करतो. दहा दिवस गणरायाचा जल्लोष असतो. या दिवसात सगळेजण मजा करतो. भक्तिभावाने गणरायाची आराधना करतो. या दिवसात सगळीकडे ओसंडून वाहत असतो. गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतो. नदी, तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन आपण करतो. पण त्यांनंतर बाप्पाचं आणि सोबत पर्यावरणाचं काय होतं याची आपल्याला कल्पना नसते. आजकाल बरेच जण घरीच बाप्पाचं विसर्जन करतात. पण त्यावर अभिनेते आदेश बांदेकर यांनी अनोख्या प्रकारे गणपतीचं विसर्जन केलं आहे. ज्याची कल्पना तुम्ही कधीही केली नसेल. आदेश बांदेकर यांच्या घरी देखील बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं होतं. त्यांच्याकडे सात दिवसांचे बाप्पा विराजमान झाले होते. बांदेकरांच्या गणपतीला शंभर हुन अधिक वर्षांची परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या आदेश बांदेकर यांच्या घरात गणरायाचे आगमन होत आहे. यांच्या घरचा गणपती बघण्यासारखा असतो. पण यावेळी चर्चा होतेय ती त्यांच्या गणपती विसर्जनाची. त्याचा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे.
या व्हिडिओमध्ये बाप्पाची मूर्ती तिच्या स्थानापासून आपोआप वरती जाते एका देवघरासारख्या जागेत ठेवली जाते. आणि त्यांनतर आपोआप एका बॉक्समध्ये बंद होते. अशा पद्धतीने या गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे. हा व्हिडोओ पाहून चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी पुढच्या वर्षी लवकर या असं कॅप्शन दिल आहे. या विसर्जनावेळी बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित असलेलं पाहायला मिळत आहे. हेही वाचा - Ali Fazal and Richa Chadha : ठरलं! रिचा चड्ढा आणि अली फजलचा होणार शाही विवाहसोहळा; वेडिंग प्लॅन आला समोर आदेश बांदेकर कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेते आहेतच शिवाय राजकारणातही ते चांगलेच सक्रिय आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून आदेश बांदेकर झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकर हे देखील अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत.