जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिरच्या लेकीचा बोल्ड अंदाज; आयरा खान हॉट PHOTO मुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत

आमिरच्या लेकीचा बोल्ड अंदाज; आयरा खान हॉट PHOTO मुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत

आमिरच्या लेकीचा बोल्ड अंदाज; आयरा खान हॉट PHOTO मुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत

चित्रपटांपासून दूर असलेली आयरा काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता आयराने तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर (Ira shares bold photo) पोस्ट केल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 एप्रिल : अभिनेता आमीर खानची (Amir Khan)  मुलगी आयरा खान (Ira khan)  चित्रपटांत दिसत नसली तरीही तिची चांगली फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. चित्रपटांपासून दूर असलेली आयरा काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता आयराने तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर (Ira shares bold photo)  पोस्ट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. आयराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagaram account) एक फक्त शर्ट घातलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तिच्या या फोटोवर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना आयराचा हा अंदाज आवडला, तर काहींनी तिला नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या. याशिवाय काही युजर्सनी तिला ट्रोल करायलाही सुरूवात केली.

जाहिरात

काही दिवसांपूर्वीच आयराने तिच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं होत. नुपूर शिखरे (Nupur Shikhare)  नावाच्या व्यक्तीला ती डेट करत आहे. तिने या रिलेशनशिपबद्दल सांगितल्यानंतरही ती चांगलीच चर्चेत आली होती.

याशिवाय सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अनेकदा ती बॉक्सिंगचे व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यामुळे आयराला चित्रपट, अभिनय यापेक्षा बॉक्सिंगमध्ये रस असल्याचं दिसून येतं.

(वाचा -  सोनू सूदनंतर रिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात; सोशल मीडियावर म्हणाली… )

एका व्हिडीओत आयराने काही दिवसांपूर्वी तिच्या नावाचा खुलासा केला होता. आजवर आयराचं नाव हे इरा असं संबोधल जायचं. पण हे साफ चुकीचं असल्याचं ती त्या व्हिडीओत म्हणते. माझ नाव हे इरा नसून आयरा आहे आणि इथून पुढे चुकीचं नाव उच्चारणाऱ्याला दंड भरावा लागेल असही ती मिश्किलपणे म्हणाली होती. चित्रपटात येण्याचा कोणताही मानस नसल्याचं तिने एकदा म्हटलं होत. अनेकदा ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत स्पॉट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात