मुंबई, 16 डिसेंबर- मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे ( aastad kale latest post) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याच्या विविध पोस्टनी नेहमी तो लक्षवेधून घेत असतो. आता त्याने अशीच एक दोन ओळीची पोस्ट केली आहे. मात्र या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. ही पोस्ट व्हायरल तर होतेच पण यावर कमेंटचा देखील पाऊस सुरू आहे.
अस्ताने फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की,रु.60लाख deposit, आणि रु.10लाख मासिक भाडं भरून राहाण्यापेक्षा घर विकत घेणं अधिक बरं नाही का??. विशेष म्हणजे, हे आकडे माझ्याशी संबंधित नाहीत, हे त्याने आवर्जुन नोंदवलं आहे. पण चाहत्यांनी अस्तादला नेमके काय म्हणायचे आहे हे क्षणात ओळखले आहे. त्याच्या या पोस्टवर एकापेक्षा एक अशा भन्नाट कमेंट येत आहेत.
वाचा -'मच्छरादाणी घातलीस काय?' उर्फी जावेद पुन्हा कपड्यावरू ट्रोल
त्याच्या या पोस्टवर चाहत्याने कमेंट करत म्हटले आहे की, ‘हाच प्रश्न मी बातमी वाचल्यापासून विचारतोय, '1. 8करोडची उलाढाल. नाही म्हटलं तरी जुहूमध्ये उच्च प्रतीचे घर नक्कीच मिळेल. पण भाड्याची जागा ऐसपैस आहे म्हणून हा खटाटोप असेल. मिमी म्हणे.' आता ही मिमी कोण? हे वेगळे सांगायला नको. अर्थात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन होय. चाहत्यांनी आस्तादच्या पोस्टचा नेमका संबंध क्रिती सेननशी जोडला आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, 'बाकी फ्लॅटमध्ये अमिताभ बच्चन यांच्या घरात राहिल्याचा आनंद नाही ना मिळणार ....'.
वाचा -प्रार्थना बेहेरेने श्रेयश तळपदेच्या सीक्रेटची कशी केली पोल, पाहा..
तर आणखी एकाने म्हटलं आहे की, '10 लाख भाडं देण्यापेक्षा अजून 10 लाख टाकले तर कल्याण, बदलापूर मध्ये विकत फ्लॅट मिळेल.' तर दुसऱ्याने म्हटले आहे की, ‘देणा-याचं माहित नाही, पण घेणारा मी असतो तर आयुष्यात किती मज्जा आली असती ना.... ' आणखी एकाने म्हटले आहे की, ‘मी रिअल इस्टेटचे काम करतो. पुण्यात असा ग्राहक असेन तर कळवा,’ अशी मजेदार कमेंट केली आहे. सध्या त्याच्या पोस्टप्रमाणे या मजेदार कमेंटची देखील चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनने अमिताभ बच्चन यांचा अंधेरी भागातील एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. यासाठी दोन वर्षांचा करार केला आहे. या घरासाठी ती दरमहा 10 लाख भाडं देणार आहे म्हणे. सिक्युरिटीपोटी यासाठ तिने 60 लाख रूपये भरल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Kriti sanon, Marathi entertainment