Home /News /entertainment /

48 वर्षीय अभिनेत्रीकडे 23 वर्षीय निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

48 वर्षीय अभिनेत्रीकडे 23 वर्षीय निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कास्टिंग काऊच निगडित साऊथच्या एका (South Actress Casting Couch) अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे.

  मुंबई 6 जुलै: बॉलिवूड असो किंवा इतर कोणतीही इंडस्ट्री कास्टिंग काऊचचा मुद्दा कायमच उचलला जातो. अनेक अभिनेत्री आपल्यासोबत झालेल्या धक्कादायक प्रकारांचा खुलासा करताना दिसत असतात. असाच खुलासा एका साऊथच्या अभिनेत्रीने केला आहे. चारमिला या साऊथच्या अभिनेत्रीने आपल्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाचा खुलासा केला आहे. चारमिला (Charmila actress) ही साऊथमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने Indiaglitz ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रसंग शेअर केला. ती कास्टिंग काऊचची शिकार होता होता वाचली. या अभिनेत्रीने नुकतीच एक मल्याळम चित्रपट केला ज्याचं शूटिंग कालिकत इथे झालं. या अभिनेत्रीचं वय 48 असल्याने तिला आईची भूमिका देण्यात आली. तर तिला बहिणीसारखं समजणाऱ्या सिनेमाच्या 23 वर्षीय निर्मात्याने केलेली मागणी ऐकून या अभिनेत्रीला धक्का बसला. अभिनेत्रींच्या मते, ती या भूमिकेमुळे बरीच आनंदी आणि उत्सुक होती. काही दिवस चांगले गेल्यावर तिच्या असिस्टंटला बोलवून घेण्यात आलं आणि तिला सेक्शुअल फेवर विचारण्यात आला. यासाठी तिला तब्ब्ल 50 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली. यानंतर तर हद्दच पार झाली कारण तिला बोलवून निर्मात्याने दोघांपैकी एकासोबत तरी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी निवडावं असं सांगितलं. हे ऐकून ती हैराण झाली. हे ही वाचा- लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल आलियाचं रोखठोक मत, रणवीर-करण जोहरला हसू अनावर
  (South actress casting couch) तिला या गोष्टीने फार धक्का बसला आणि तिला हे पटलं नाही. तिने निर्मात्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या मुलापेक्षा वयाने थोडेसेच मोठे आहात त्यामुळे मला आईसारखंच समजा. हे सांगून त्यामुळे त्यांची ऑफर नाकारत अभिनेत्री चेन्नईला रवाना झाली.तिने अनेक सिंगल मदर असणाऱ्या अभिनेत्रींना अशा माणसांपासून जपून राहायचा सल्ला दिला आहे.
  चारमिलाबद्दल सांगायचं तर ही एक प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री आहे. तिच्या पर्सनल फ्रंटवर तिची दोन लग्न झाली होती आणि ती दोन्ही लग्न अयशस्वी झाली. सध्या ही अभिनेत्री आपल्या मुलासह राहते. ही अभिनेत्री गेली वीस वर्षांहून अधिक इंडस्ट्रीत कार्यरत आहे. कास्टिंग काऊचबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. अनेक निर्माते, दिग्दर्शक व इतर अनेक मंडळी अभिनेत्रींना शारीरिक सुखाच्या बदल्यात मोठमोठ्या ऑफर देताना दिसतात असं अनेकदा समोर आलं आहे. सध्याच्या या प्रसंगातून धक्कादायक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Casting couch, South actress

  पुढील बातम्या