Home /News /entertainment /

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल आलियाचं रोखठोक मत, रणवीर-करण जोहरला हसू अनावर

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल आलियाचं रोखठोक मत, रणवीर-करण जोहरला हसू अनावर


लग्नात अग्निभोवती सात फेरे घेतल्यानंतर आपला सर्वांत मोठा कोणता समज दूर होतो? असा प्रश्न करण जौहरने आलिया भट्टला विचारला.

लग्नात अग्निभोवती सात फेरे घेतल्यानंतर आपला सर्वांत मोठा कोणता समज दूर होतो? असा प्रश्न करण जौहरने आलिया भट्टला विचारला.

लग्नात अग्निभोवती सात फेरे घेतल्यानंतर आपला सर्वांत मोठा कोणता समज दूर होतो? असा प्रश्न करण जौहरने आलिया भट्टला विचारला.

    नवी दिल्ली, 06 जुलै : 'आलिया आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील नेहमी चर्चेत राहणारं जोडपं आहे. आधी लग्न त्यानंतर कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी देऊन आलियाने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आलिया आगामी काही दिवसांमध्ये रणवीरसिंहसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan 7) या शोमध्ये दिसणार आहे. यात आलियाने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल भाष्य केल्याने आश्चर्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिग्दर्शक करण जौहरचा आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया आणि रणवीरसिंहची जोडी एकत्र दिसणार आहे. त्याचमुळे या दोघांना ‘कॉफी विथ करण’ या शोचे पहिले पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. पहिल्या एपिसोडचा (Episode) प्रोमो नुकताच समोर आला. यात आलिया आणि रणवीरसिंह दोघेही मोकळेपणाने बोलले. 7 जुलै रोजी हा शो हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रसारित होणार आहे, असं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल नेमकं काय म्हणाली आलिया? लग्नात अग्निभोवती सात फेरे घेतल्यानंतर आपला सर्वांत मोठा कोणता समज दूर होतो? असा प्रश्न करण जोहरने आलिया भट्टला विचारला. यावर उत्तर देताना आलिया म्हणाली की, ‘लग्नाच्या दिवशीच सुहागरात्र म्हणजे लग्नानंतरची पहिली रात्र साजरी होते असं काही नसतं. कारण तुम्ही खूप थकून गेलेले असता.’ आलियाचं हे उत्तर ऐकून रणवीर आणि करण या दोघांना हसू आवरलं नाही. म्हणजे थोडक्यात आलियाला लग्नानंतर वास्तवाचं भान आल्यामुळेच हे दोघं हसल्याचं लक्षात येतं. तुझी बेस्ट ऑनस्क्रिन केमिस्ट्री कुठल्या अभिनेत्यासोबत जुळते असा दुसरा प्रश्न करण आलियाला विचारलं. यात तिला रणवीर सिंह आणि वरुण धवन असे दोन पर्याय तिला दिले गेले. आलियाचं उत्तर ऐकून मात्र रणवीर नाराज होऊन उठून बाहेर जायला लागला. परंतु नंतर करणने त्याला पुन्हा स्टेजवर आणलं, असं या प्रोमोमध्ये दिसतंय. या सिझनमध्ये दिग्गज लावणार शोमध्ये हजेरी कॉफी विथ करण या शोमध्ये या सिझनमध्ये दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. यावेळी आलिया भट्ट, रणवीर सिंह, जान्हवी कपूर, कियारा आडवाणी, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, वरुण धवन, अनिल कपूर, समांथा रूथ प्रभू, क्रिती सेनन आणि अनन्या पांडे अशा दिग्गज कलावतांना करण जोहर प्रश्न विचारून भांडावून सोडणार आहे. अल्लडपणा आणि खोडकर स्वभावामुळे आलिया भट्ट नेहमी चर्चेत असते. तिने साकारलेल्या अभिनयाला चाहत्यांनी नेहमी भरभरून दाद दिली आहे. खासगी आयुष्याबद्दलचे फोटो आणि व्हिडिओ आलिया नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. एखाद्या कार्यक्रमात आपले विचार मांडताना फारसा विचार न करता ती ओघात बोलून जाते. पण नंतर तिची फजिती झाल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे.
    First published:

    पुढील बातम्या