नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : देशाची राजधानी दिल्लीतील कँटमधील जुन्या नांगली गावात एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पुजाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांसह मिळून मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली होती. चौकशीदरम्यान आरोपी पुजाऱ्याने सांगितलं की, बलात्कार केल्यानंतर ती माझं नाव इतरांना सांगेल या भीतीने मी तिची गळा दाबून हत्या केली. मुलीच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की, आरोपी राधेश्या याने त्यांना मुलीच्या मृतदेहाजवळही जाऊ दिलं नाही. आरोपीने त्यांना पोलिसांची भीती घालून धमकी दिली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित राधेश्याम याने आपला एन्ड्रॉइड फोन चितेत फेकून दिलं होतं. मात्र मोबाइलचे काही भाग चितेच्या बाहेर पडले होते. फॉरेन्सिक टीमने ते सर्व ताब्यात घेतले आहेत. यामुळे पुजाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. चितेजवळ मोबाइलचे पार्ट्स सापडले गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित राधेश्या याने मोबाइल चितेच्या दिशेने फेकला होता. मात्र मोबाइलमधील काही पार्ट चितेच्या जवळ जमिनीवर पडले होते. त्यामुळे हे भाग जळाले नाहीत. या पार्टमुळे मोठा खुलासा झाला आहे. हे ही वाचा- 50 रुपयांच्या वादात 18 महिन्यांच्या बाळाचा घेतला जीव; टेरेसवर नेलं आणि… आरोपीने कुटुंबीयांना मृतदेह पाहू दिला नाही मुलीच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की, राधेश्यामने त्यांना मुलीच्या मृतदेहाजवळ येऊ दिलं नाही, इतकच नाही तर त्याने मृतदेह पाहूदेखील दिला नव्हता. आरोपीने त्यांना पोलिसांनी भीती घालून गप्प बसायला सांगितलं. तो कुटुंबीयांना असंही म्हणाला होता की, घरी जाऊन कोणालाही मुलीबद्दल काहीच सांगू नका. धक्कादायक म्हणजे प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून त्याने मुलीचा मृतदेह उलटा ठेवला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतेय मुलगी पोलिसांना स्मशानघाटासमोर एक खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज सापडलं आहे. यामध्ये 5.15 वाजता मुलगी स्मशानात आली. तिच्या हातात पाण्याची बाटली आदी काहीच नाही. त्यानंतर साधारण 6.30 वाजता तो मुलीच्या आईला बोलवायला गेला होता. त्यानंतप 10 ते 15 मिनिटांनी मुलीचे वडील स्मशानात आले होते. मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ ठेवायचा पंडीत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित राधेश्याम याच्याजवळ तीन मोबाइल होते. ज्यातील एका एन्ड्रॉइड फोनमध्ये सीम कार्ड नव्हतं. पंडित त्याचा वापर केवळ अश्लील व्हिडीओ पाहण्यासाठी करीत होता. घटनेनंतर हा फोन तोडून जळत्या चितेत फेकून देण्यात आलं होतं. मोबाइलमध्ये पकडले जाऊ या भीतीने त्याने फोन चितेत टाकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.