सौदी अरेबिया 16 जून : केवळ मोबाईलमध्ये आपत्तीजनक फोटो (Offensive Pic In Mobile) आढळले म्हणून कोणाला मृत्यूची शिक्षा मिळू शकेल, असा विचार तुम्ही कधी केलाय का? मात्र, ही घटना खरंच घडली आहे. एका तरुणाला केवळ एवढ्यासाठी मृत्यूची शिक्षा दिली गेली, कारण त्याच्या फोनमध्ये एक आपत्तीजनक फोटो आढळला होता. हा मुलगा अल्पवयीन असताना त्याला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. ही घटना सौदी अरेबियातील असून हा तरुण अल्पसंख्यांक शिया समुदायातील होता.
PHOTOS: ट्रकची कारला भीषण धडक, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू
द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, आरोपीचं नाव मुस्तफा अल दर्विश असं आहे. त्याचं वय 26 वर्ष होतं. सौदी अरेबियानं असं अनेकदा म्हटलं आहे, की ते अल्पवयीन मुलांना मृत्यूची शिक्षा देत नाहीत. मात्र, तरीही मुस्तफाला मृत्यूची शिक्षा देण्यात आली. मुस्तफाला ज्या आरोपात अटक करण्यात आली होती, तो गुन्हा त्यानं 17 वर्ष आधी केला होता. मुस्तफावर असा आरोप होता, की तो वयाच्या 17 व्या वर्षी अरब स्प्रिंगच्या एका प्रदर्शनात सामील झाला होता. मुस्तफा शिया समाजातील होता. पोलिसांना मुस्तफाच्या फोनमध्ये एक आपत्तीजनक फोटो आढळला होता. याच कारणामुळे त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली (sentenced to death For Offensive Pic In Mobile) .
नरभक्षकानं आईला मारुन मृतदेहाचे हजार तुकडे करत खाल्ले, मिळाली 15 वर्षाची शिक्षा
सौदी अरब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुस्तफाला 2015 मध्ये त्याच्या दोन साथीदारांसह अटक पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेला फोटो देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक होता. मुस्तफा तब्बल 10 दंगलींमध्ये सामील झाला होता. मुस्तफानं मृत्यूआधी कोर्टात म्हटलं होतं, की सहा वर्ष त्याच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती. पोलिसांच्या टॉर्चरला कंटाळून त्यानं आपला गुन्हा मान्य केला. मुस्तफाच्या कुटुंबीयांनी म्हटलं, की त्याचा मृत्यू हा संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूसारखा आहे. फोनमध्ये केवळ एक आपत्तीजनक फोटो आढळल्यानं त्याला मृत्यूची शिक्षा भोगावी लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Saudi arabia, Stays on hanging