लखनऊ, 2 जानेवारी : एकतर्फी प्रेमातून (One way love) तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला (Stabbed) करून तिचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तरुण तिच्या मागावर होता. काहीही करून तिला प्रेमासाठी तयार करण्याचा चंग त्याने बांधला होता. मात्र तरुणीने प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने तरुणीवर थेट चाकूने हल्ला करत तिचा जीव घेतला. अशी घडली घटना उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं त्याच परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तो आतूर होता. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून तरुणीचं लक्ष वेधून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र तरुणी त्याला नकार देत होती. काहीही करून या तरुणीला आपल्याशी लग्न करायला तयार करायचं, असा चंग त्याने बांधला होता. तरुणीने दिला नकार तरुणाने एक दिवस तरुणीला याबाबत थेट विचारणा केली. आपलं तुझ्यावर प्रेम असून आपल्याला लग्न करण्याची इच्छा असल्याची त्यानं सांगितलं. मात्र तरुणीला त्याच्यात रस नसल्यामुळे तिने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे स्वाभिमान दुखावला गेलेल्या तरुणाने तिचा बदला घेण्याचा आणि तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तरुणीवर केले वार घटनेच्या दिवशी तरुणी रस्त्यातून चालली असताना हा तरुण तिथे आला. त्याने सोबत चाकू आणला होता. तरुणीच्या पोटात एकामागून एक वार करत त्याने तिच्यावर हल्ला केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हे वाचा- पुण्यात मध्यरात्री हत्येचा थरार; भलत्याच संशयातून पतीने पत्नीचा केला खेळ खल्लास पोलीस कारवाई सुरू पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांना या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एका माथेफिरू तरुणामुळे आईवडिलांना आपली लेक गमावावी लागली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.