गोपालगंज (बिहार), 24 एप्रिल : बिहारमधील गोपालगंजमध्ये (gopalganj) एका तरुणाची घरातून बोलावून हत्या (murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसडिला बाजार येथील आहे. रविवारी सकाळी पोलिसांनी भेड़िया रेल्वे रुळावरून मृतदेह बाहेर काढला. आलोक कुमार असे मृताचे नाव आहे. जो बसडिला बाजार येथील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव संत शाह असे आहे. या तरुणाची हत्या केल्यानंतर त्याच्याजवळचे 65 हजार रुपये लुटण्यात आले, असा आरोपही करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
मृताचे वडील संत शाह यांनी सांगितले की, त्यांचा मुलाग कतार देशात राहत होता. पाच दिवसांनंतर तो कतार येथे परत जाणार होता. परदेशात जाण्यासाठी त्याने 65 हजार रुपये जवळ ठेवले होते. कॅश घेऊन तो आपल्या मित्राबरोबर गेला मात्र, परत आला नाही. पैशांच्या मोहात त्याच्या मित्रानेच आलोकची हत्या करुन मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी लावला आहे.
हेही वाचा - कर्नाटकात हिजाबनंतर आता नवा वाद! विद्यार्थ्यांना शाळेत बायबल घेऊन जाणं बंधनकारक केल्यानं गोंधळ
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललन कुमार म्हणाले की, मृताच्या नातेवाईकांकडून लेखी तक्रार मागितली आहे. या तरुणाच्या मृत्यूचे कारण हत्या की आत्महत्या याचा दोन्ही बाजूने तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.