अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 22 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पळून जाऊन प्रेम विवाह केल्यानंतर तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. यामुळे या प्रेमकहाणीचा वेदनादायी अंत झाला. उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एका प्रेमकथेचा वेदनादायक अंत झाला आहे. प्रियकर आणि प्रेयसीचे नाते हे पती-पत्नीच्या नात्यात रुपांतर झाल्यावर पाच दिवसांतच हे नाते तुटले. पतीने पत्नीसमोरच जीव दिला. लग्नानंतर पत्नीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण करून अत्याचार केले. यामुळे कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली, असा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या लखीमपूर खेरी येथील सर्वत पुर गावात राहणाऱ्या 22 वर्षीय धीरजचे गावात राहणाऱ्या रोली गिरीसोबत प्रेमसंबंध होते. दोघे 14 मार्च रोजी लखनऊला आले आणि आर्य समाज मंदिरात त्यांनी लग्न केले. यानंतर ते लखनऊच्या मादियानव येथील एल्डेको ग्रीनमध्ये भाड्याने राहू लागले. अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, मुलगी बॉयफ्रेंडसोबत फोनवर दिसली, अन् बापानं थेट विषयच संपवला रोलीने सांगितले की, 18 मार्च रोजी धीरजने तिला खोलीत कोंडले आणि स्वत: हॉलमध्ये आत्महत्या केली. दरम्यान, तिने कसे तरी दरवाजा तोडून धीरजला बाहेर काढले आणि ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती चिंताजनक पाहून धीरजला बलरामपूर रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, येथील क्रिटिकल केअर युनिटमध्ये दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर धीरजचा मृत्यू झाला. धीरजने गळफास घेताच रोलीने तिचे सासरे सुनील यांना फोन करून माहिती दिली. यानंतर धीरज आणि रोली या दोघांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. धीरजच्या नातेवाईकांनी सून आणि कुटुंबीयांनी आपल्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. प्रेमविवाह केल्यामुळे त्याच्या मेहुण्यालाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तो खूप दुःखी झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात गळफास हे मृत्यूचे कारण सांगितले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.