मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

फोटो काढण्यासाठी आला आणि खून करून गेला, कौटुंबिक वादातून मेहुण्याची हत्या

फोटो काढण्यासाठी आला आणि खून करून गेला, कौटुंबिक वादातून मेहुण्याची हत्या

लग्नात सगळे फोटोसाठी पोज देऊन उभे होते. तेवढ्यात तरुणाने आपल्या खिशातील चाकू काढला आणि शेजारी उभ्या असणाऱ्या मेहुण्यावर वार केले.

लग्नात सगळे फोटोसाठी पोज देऊन उभे होते. तेवढ्यात तरुणाने आपल्या खिशातील चाकू काढला आणि शेजारी उभ्या असणाऱ्या मेहुण्यावर वार केले.

लग्नात सगळे फोटोसाठी पोज देऊन उभे होते. तेवढ्यात तरुणाने आपल्या खिशातील चाकू काढला आणि शेजारी उभ्या असणाऱ्या मेहुण्यावर वार केले.

    जयपूर, 5 डिसेंबर: कौटुंबिक वादातून तरुणाने (Murder of brother in law) त्याच्या सख्ख्या मेहुण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आईवडिलांना फितवून आपल्याविषयी गैरसमज (Murder in family dispute) निर्माण करत असल्याचा राग मनात धरून तरुणाने त्याच्या मेहुण्याला (Stabbed in stomach) भर लग्नात चाकूनं भोसकलं. वार वर्मी लागल्यामुळे मेहुण्याचा मृत्यू झाला आहे. या घटनमुळे सर्वांना धक्का बसला असून कुटुंबात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. कौटुंबिक वादातून हत्या राजस्थानच्या झुंझुनुं भागात राहणारा रहीम आणि त्याचा मेहुणा नासीर हुसैन यांच्यात वाद सुरू होते. रहीमचा छोटा भाऊ शाहिदचं लग्न होतं. मात्र या लग्नात जर रहीमला बोलावलं, तर आपण येणार नाही, अशी भूमिका नासीरनं घेतली होती. जावयाच्या या भूमिकेमुळे रहीमच्या आईवडिलांनी त्याला लग्नाला येण्यास मनाई केली होती. जावयाचा मान राखायचा असेल, तर त्याचा शब्द पाळायला हवा, असं सांगत रहीमला त्यांनी लग्नात न येण्याची ताकीद दिली. यामुळे आपला अपमान झाल्याची सल रहीमला टोचत होती. त्यासाठी त्याने मेहुणा नासीरचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. फोटो काढताना केले वार लग्नात गैरहजर राहिलेला रहीम वरातीच्या वेळी घटनास्थळी दाखल झाला. एकत्र फोटो काढण्याच्या निमित्तानं तो नासीरपाशी गेला. येताना त्याने जॅकेटच्या खिशात चाकू लपवून आणला होता. फोटो काढण्यासाठी सर्वांनी पोझ दिल्यानंतर नासीरचं लक्ष नसल्याची संधी साधत त्याने खिशातील चाकू काढून नासीरच्या पोटात खुपसला. यात नासीर गंभीर जखमी झाला आणि त्याचं उपचारांदरम्यान निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा-  Omicron Effect: US आणि UK त जाण्यासाठी नियमांत बदल, पुन्हा नव्या अटी पोलीस तपास सुरु या घटनेनंतर फरार झालेल्या रहीमचा पोलिसांनी शोध सुरू केला. दिवसभर पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या रहीमला पोलिसांनी अखेर एका घरातून अटक केली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. मेहुणा नासीरचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, FAMILY, Marriage, Police, Rajsthan

    पुढील बातम्या