मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron Effect: US आणि UK त जाण्यासाठी नियमांत बदल, पुन्हा नव्या अटी

Omicron Effect: US आणि UK त जाण्यासाठी नियमांत बदल, पुन्हा नव्या अटी

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या केसेस वाढू लागल्यानंतर आता अमेरिका आणि यके यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे नियम कडक केले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या केसेस वाढू लागल्यानंतर आता अमेरिका आणि यके यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे नियम कडक केले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या केसेस वाढू लागल्यानंतर आता अमेरिका आणि यके यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे नियम कडक केले आहेत.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 5 डिसेंबर: ओमिक्रॉनच्या दहशतीमुळे अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांनी देशात येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांत बदल केले आहेत. ओमिक्रॉन फैलावण्याची भीती आणि प्रसाराचा वेग याचा विचार करता निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. भारतासह अनेक देशांतून अमेरिका आणि युकेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या नव्या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. काय आहेत नवे नियम अमेरिका आणि युकेनं नव्या आठवड्यापासून नवे नियम लागू केले आहेत. अमेरिकेत हे नियम सोमवारपासून तर युकेमध्ये मंगळवारपासून अंमलात येणार आहे. या नियमांची पूर्तता केल्याखेरीज कुणालाही देशात प्रवेश दिला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी प्रत्येकासाठी बंधनकारक असणार आहे. दोन वर्षे वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या प्रत्येकासाठी हे नियम लागू असणार आहेत. चाचणी बंधनकारक देशात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अत्यावश्यक असणार आहे. प्रवास सुरु करण्यापूर्वी 48 तासांत घेतलेल्या चाचणीचे रिपोर्ट सादर करणं बंधनकारक असणार आहे. त्यापूर्वीचे रिपोर्ट असतील आणि ते निगेटिव्ह असतील, तरी ते गृहित धरण्यात येणार नसल्याचं दोन्ही देशांच्या प्रशासनांनी स्पष्ट केंलं आहे. यापूर्वी कोरोनाची लागण होऊन गेलेल्या व्यक्तींना बरे झाल्याचे प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे. प्रवास सुरु करण्यापूर्वी किमान 90 दिवस कोरोनातून बरे झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. हे वाचा- साहित्य संमेलनातही कोरोनाचा शिरकाव, संमेलनात आलेले दोण जण कोरोना पॉझिटिव्ह पाश्चिमात्य देशात ओमिक्रॉनचं संक्रमण पाश्चिमात्य देशांतही आता ओमिक्रॉन व्हायरसचं संक्रमण झालं असून आतापर्यंत अमेरिकेत ओमिक्रॉनचे 20 रुग्ण आढळून आले आहेत. तर ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे 160 रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या या व्हायरसचं अस्तित्व जगातील अनेक देशांत दिसायला सुरुवात झाल्यांनंतर आता सर्वच देशांनी प्रवासाचे नियम कडक करायला सुरुवात केली आहे.
First published:

Tags: Corona, Uk, USA

पुढील बातम्या