मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणीनं Video Call वर उतरवले कपडे, मग सुरू झाला Blackmail चा खेळ

तरुणीनं Video Call वर उतरवले कपडे, मग सुरू झाला Blackmail चा खेळ

तरुणाला एक व्हिडिओ कॉल आला. कॉलवर असणारी तरुणी अंगावरचे कपडे उतरवत होती. हा कॉल भविष्यात मोठा मनस्ताप देणार आहे, याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.

तरुणाला एक व्हिडिओ कॉल आला. कॉलवर असणारी तरुणी अंगावरचे कपडे उतरवत होती. हा कॉल भविष्यात मोठा मनस्ताप देणार आहे, याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.

तरुणाला एक व्हिडिओ कॉल आला. कॉलवर असणारी तरुणी अंगावरचे कपडे उतरवत होती. हा कॉल भविष्यात मोठा मनस्ताप देणार आहे, याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.

पटना, 3 जानेवारी: एका तरुणाला (youth) आगंतुक तरुणीकडून (Young girl) आलेल्या व्हिडिओ कॉलमुळे (Video Call) चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या तरुणीनं तरुणाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्याकडे पाहून हसू लागली. ही तरूणी कोण आहे, याचा विचार तरुण करत असतानाच तिने तिचे कपडे उतरवायला (Getting nude) सुरुवात केली. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे तरुणाला मनस्ताप तर झालाच, मात्र ज्या प्रकारे तरुणानं या संकटाचा सामना केला, त्यासाठी त्याचं सर्वदूर कौतुकही झालं.

अशी घडली घटना

बिहारच्या पटनामध्ये विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अगोदर एक फोन आला. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला विमा काढायचा असून त्याचे डिटेल्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देण्याची विनंती तरुणीनं केली. तरुणाने नंबर दिल्यानंतर तरुणीने त्याला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्याकडे पाहून हसू लागली. तरुणाला काही समजण्याच्या आतच तिने स्वतःचे एकेक कपडे काढायला सुरुवात केली आणि काही मिनिटांत ती पूर्ण नग्न झाली. त्यानंतर फोन कट झाला.

सुरू झालं ब्लॅकमेलिंग

काही वेळातच तरुणाच्या मोबाईलवर काही फोटो आले. त्यात नग्न तरुणी आणि तिच्याकडे पाहणारा तरुण असा फोटो होता. ते पाहून तरुणाला जबर धक्का बसला. तरुणीने त्याला फोन केला आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये, असं वाटत असेल, तर 50 हजार रुपये देण्याची मागणी केली. मात्र तरूणाने ही मागणी फेटाळून लावत तिला पैसे देण्यास नकार दिला. त्यावर तरुणीने हा व्हिडिओ सायबर सेलकडे पाठवण्याची धमकी दिली.

बनावट सायबर सेल

दुसऱ्या दिवसापासून तरुणाला पोलिसांच्या सायबर सेलमधून फोन आल्याचं भासवत कॉल येऊ लागले. तुझ्याविरोधात तक्रार दाखल झाली असून लवकरच तुला अटक होऊ शकते, असं कॉलवरून सांगण्यात आलं. अटक टाळायची असेल, तर तरुणीसोबत सेटलमेंट करण्याचा सल्लाही त्याला देण्यात आला. मात्र तरुणाने त्यालाही भीक घातली नाही. त्यानंतर दिवसाला 50 कॉल येऊ लागले. मात्र तरुण पैसे न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिला.

हे वाचा- IAS अधिकाऱ्याच्या सुनेची आत्महत्या;2 महिन्यांपूर्वी झालं लग्न, वडिलांना केला फोन

तरुणाने केली तक्रार

अखेर तरुणाने सायबर सेलमध्ये धाव घेत या प्रकाराची माहिती दिली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हेगारांचा तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या केसमध्ये लोक बदनामीच्या भितीनं पैसे देतात आणि लुबाडले जातात. मात्र या तरुणाने दाखवलेलं धैर्य अनोखं असल्यामुळं त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

First published:

Tags: Crime, Police, Video call