मुंबई, 6 जानेवारी: तलवारीनं (Sword) केक (Cake) कापून वाढदिवस (Birthday) साजरा (Celebrate) करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या (Police arrested two) ठोकल्या आहेत. उत्साहाच्या भरात त्यानं दोन मित्रांना गोळा करून भर रस्त्यात केक कापण्याचा सोहळा पार पाडला. तरुणानं हातात तलवार घेतली आणि समोर ठेवलेले तीन एक एकामागून एक कापले. तलवारीनं केक कापण्याचा हा प्रकार त्याला भलताच महागात पडला आहे.
कांदिवली भागात 22 वर्षीय पठ्ठ्याने तलवारीने केक कापला. वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. pic.twitter.com/NEKG0CUbKI
— News18Lokmat (@News18lokmat) January 6, 2022
अशी घडली घटना मुंबईतील कांदिवली भागात राहणाऱ्या सिलम बर्षम सुब्रह्मण्यम या 22 वर्षांच्या तरुणाने त्याच्या मित्रासोबत केक कापण्याचा निर्णय घेतला. कांदिवलीतील रघुलीला मॉलसमोरच्या फुटपाथवरच थेट तलवार काढून हा केक कापण्यात आला. त्याचा एक मित्र शेजारी उभा होता, तर दुसऱ्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओत तरुण तलवारीने केक कापताना दिसतो, तर त्याच्या शेजारी उभा असलेला आणि रेकॉर्डिंग करणारा मित्र त्याच्या वाढदिवसाचं गाणं गाताना दिसतात. सिलमने त्याच्यासमोर ठेवलेले तीन केक एकामागून एक कापले आणि वाढदिवस उत्साहात साजरा केला. व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याच्या मित्रांनी तो सोशल मीडियावर टाकला. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला. भर रस्त्यावर तलवार काढून त्याने केक कापण्याचा हा प्रकार अनेकांची उत्कंठा वाढवणारा आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. त्यामुळे बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला. फिरत फिरत हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत हा प्रकार करणाऱ्या तरुणांचा शोध सुुरू केला. हे वाचा- पाठलाग करुन तरुणाला चाकूने भोसकलं; थरारक घटनेचा LIVE VIDEO Viral पोलिसांनी केली अटक रस्त्यावर अशा प्रकारे तलवार काढणे हा गुन्हा आहे. तलवार बाळगणे आणि रस्त्यावर ती परजणे या गोष्टी गुन्हा आहेत. त्यातच सार्वजनिक ठिकाणी तलवार काढून केक कापल्यामुळे अनेकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करत, त्यावर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी या प्रकऱणी सिलम आणि त्याचा मित्र कौसर खान यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.