जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आता बागेश्वर धाममधून शिक्षक बेपत्ता; धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी घरातून निघाला अन्...

आता बागेश्वर धाममधून शिक्षक बेपत्ता; धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी घरातून निघाला अन्...

बागेश्वर धाममधून शिक्षक बेपत्ता

बागेश्वर धाममधून शिक्षक बेपत्ता

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी घरातून बाहेर पडलेला तरुण बेपत्ता झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Darbhanga,Darbhanga,Bihar
  • Last Updated :

दरभंगा, 19 फेब्रुवारी : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी घरातून बाहेर पडलेला तरुण बेपत्ता झाला आहे. ललन कुमार असं या तरुणाचं नाव आहे. तो जिल्ह्यातील बहेडी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गावात राहातो. ललन कुमार हा चार फेब्रुवारी रोजी दरभंगामधून बागेश्वर धामला जाण्यासाठी निघाला होता. बागेश्वर धामला पोहोचल्यानंतर ललन कुमार फोनवर आपल्या पत्नीसोबत बोलला देखील होता. त्याच्या पत्नीचं त्याच्यासोबत शेवटच बोलनं सहा फेब्रुवारी रोजी झालं होतं. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. कुटुंबाने एक दिवस वाट पाहिली मात्र त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ न शकल्यानं अखेर याबाबत कुटुंबाकडून बहेडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं ललन कुमार याच्या नातेवाईंकांनी दरभंगा गाठत शहर पोलिसांमध्ये तरुण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सरकारी शाळेत शिक्षक तक्रार प्राप्त झाल्यानंतर दरभंगा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. त्यांनी या प्रकरणाची मध्य प्रदेश पोलिसांना देखील माहिती दिली. मात्र अद्यापही ललनचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. ललन कुमार हा एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहे. दोन मुलं आणि पत्नी असं त्याचं कुटुंब आहे. ललन कुमार अचानक गायब झाल्यानं त्याचं कुटुंब चिंतेत आहे. हेही वाचा : प्रियकर बोलत नाही म्हणून तरुणीचं धक्कादायक कृत्य, आधी आईच्या छातीवर बसली अन् नंतर.., घटनेनं औरंगाबादेत खळबळ सहा फेब्रुवारीनंतर मोबाईल बंद घटनेबाबत माहिती देताना ललन कुमारची पत्नी सबिता कुमारी यांनी सांगितलं की, ललन कुमार चार फेब्रुवारी रोजी दरभंगा स्टेशनवरू पवन एक्स्प्रेसने बागेश्वर धामला जाण्यासाठी निघाला होता. बागेश्वर धामला पोहोचल्यानंतर त्याने फोन देखील केला. त्याच्याशी शेवटच बोलनं सहा फेब्रुवारी रोजी झालं होतं. तेव्हापारून त्याचा मोबाईल बंद आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात