मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गाडी लावण्यावरून झाले भांडण, चाकूने वार करून तरुणाला संपवलं

गाडी लावण्यावरून झाले भांडण, चाकूने वार करून तरुणाला संपवलं

सोमवारी दुपारी विठ्ठलच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला होता. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही खुनाची घटना घडली.

सोमवारी दुपारी विठ्ठलच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला होता. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही खुनाची घटना घडली.

सोमवारी दुपारी विठ्ठलच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला होता. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही खुनाची घटना घडली.

किशोर गोमासे, प्रतिनिधी

वाशिम, 02 मार्च :  गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलुबाजार येथील विठ्ठल  अशोक पानभरे आणि कुलदीप गाढवे यांच्यामध्ये सोमवारी रात्री 10. 30 ते 11 वाजेदरम्यान चारचाकी गाडी लावण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

IND vs ENG : रोहितच्या जागी विराटचा फेवरेट खेळाडू वनडे सीरिज खेळणार!

त्यामुळे रागाच्या भरात कुलदीप गाढवे याने विठ्ठल पानभरेला चाकूने भोसकले. यात विठ्ठल पानभरे हा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत विठ्ठलच्या कुटुंबीयांनी  त्याला उपचारासाठी अकोला इथं घेऊन जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

मृतक विठ्ठल पानभरे आणि कुलदीप गाढवे यांच्यामध्ये या अगोदरही ही किरकोळ वाद असल्याचं बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे, सोमवारी दुपारी विठ्ठलच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला होता. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही खुनाची घटना घडली. विठ्ठल हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आहे. तर आरोपी कुलदीप गाढवे याला ही दोन लहान मुलं आहेत. विठ्ठलच्या मृत्यूमुळे गावात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोनं खरेदीची हीच आहे सुवर्णसंधी! एका क्लिकवर पाहा आजची Gold Price

या घटनेनंतर आरोपी कुलदीप गाढवे हा गावातून फरार झाला होता.  मंगरुळपिर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे कर्मचारी गोपाल कवर हे कुलदीपचा शोध घेत होते. अखेर दुपारी कुलदीपला वाशिममधून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: खून, वाशिम