Home /News /viral /

नागमोडी वळणावर ओव्हरटेक करायला गेला आणि घात झाला...अपघाताचा LIVE VIDEO

नागमोडी वळणावर ओव्हरटेक करायला गेला आणि घात झाला...अपघाताचा LIVE VIDEO

जीप कारला धडक देऊन पुढे असलेल्या दुकानावर आदळली. यामध्ये कारचं आणि दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे.

    हमीरपूर, 05 सप्टेंबर : वळणावर ओव्हरटेक करणं जीप चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात मोठा अपघात झाला आहे. अल्टो कार आणि जीपची भीषण धडक झाली आहे. ही अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिमाचलच्या हमीरपूर इथे हा भीषण अपघात घडला. भरधाव असणारी कार आणि समोरून वळणावरून ओव्हरटेक करून येत असलेला छोटा मिनी ट्रक एकमेकांना धडकले. अवघड वळणावर वारंवार वेगावर नियंत्रण ठेवायला सांगितलं जातं. मात्र तरीही अनेकदा वेग आणि ओव्हरटेक याबाबत सांगूनही नागरिक लक्ष देत नाही. अशा प्रकारचे अपघात घडतात. हे वाचा-फुगे बांधून पठ्ठ्यानं रचला वर्ल्ड रेकॉर्ड, 25 हजार फूटांवर जाऊन पोहचला अन्... ही जीप कारला धडक देऊन पुढे असलेल्या दुकानावर आदळली. यामध्ये कारचं आणि दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे तुटला तर दुकानावर गाडी आदळल्यानं नुकसान झालं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवानं हे दुकान बंद असल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. जीप भोटा परिसरात जात होता आणि समोरून अल्टो कार येत होती. दोघांचाही वेग जास्त होता आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्येही भीषण अपघात झाला. यपूरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसची एका ट्रकला धडक बसली आहे. या भीषण अपघातामध्ये 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गंजम येथून मजुरांसह गुजरातकडे बस निघाली होती होती.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या