बाराबंकी, 22 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील बाराबंकीतील केवडी गावात प्रेमप्रकरणातून एका तरुणाला जीव गमवावा लागला. आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केली, नंतर तलावात ढकलून दिले. एवढेच नाही तर तरुणाला तलावात ढकलून बुडविण्यासाठी त्याच्यावर अनेक विटाही बांधण्यात आल्या. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय मोहम्मद जसीमचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून दीड वर्षापूर्वी दोन्ही पक्षांत बराच वाद झाला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी मुलीकडच्या लोकांनी जसीमवर जीवघेणा हल्ला केला. आधी जासीमला बेदम मारहाण केली आणि नंतर तलावात ढकलले. त्यानंतर जसीमला तलावात बुडवण्यासाठी त्याच्यावर अनेक विटाही बांधण्यात आल्या. त्यामुळे जसीमला तलावातून बाहेर पडता आले नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. घरातून पळून केलं Love Marriage, चौथ्याच दिवशी तरुणाचा टोकाचा निर्णय, लव्ह स्टोरीचा असा वेदनादायी अंत मृत जसीम हा त्याच तलावाच्या काठावर गोमटी ठेवून दुकान चालवत असे. तर मृत जसीमच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, तिने घराच्या टेरेसवरून पाहिलं की, काही लोक तिचा भाऊ जसीमशी भांडत आहेत. भांडणानंतर त्या लोकांनी जसीमला तलावात ढकलले आणि त्याच्यावर अनेक विटाही लादल्या. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. जेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी गेली तेव्हा पलीकडच्या लोकांनी तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. दुसरीकडे, मृत जसीमच्या इतर नातेवाईकांनी सांगितले की, मुलीकडच्या लोकांकडून अनेकदा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तलावातून मृतदेह बाहेर काढला. बाराबंकीचे एसपी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, प्रेमप्रकरणातून जुना वाद याठिकाणी सुरू होता. त्यातून ही हत्या करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







