मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! व्हिजा यायला उशीर झाल्याने तरुणानं संपवलं आयुष्य अन् दुसऱ्याच दिवशी...

धक्कादायक! व्हिजा यायला उशीर झाल्याने तरुणानं संपवलं आयुष्य अन् दुसऱ्याच दिवशी...

सैनीचे कुटुंबीय आणि पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या कुटुंबीयांना त्याची मोटारसायकल आणि चप्पल कालव्याच्या काठावर आढळून आली.

  • Published by:  Kranti Kanetkar

कुरुक्षेत्र: परदेशात जाण्याचं स्वप्न होतं पण व्हिजा मिळायला उशीर झाल्याने तणाव आला. त्यातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणाने जरा थांबला असता तर त्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं. पण उशीर झाला आणि सगळंच संपलं. तणावातून तरुणाने आयुष्य संपवलं आहे.

कॅनडाचा व्हिसा मिळण्यात उशीर झाल्याच्या रागातून 23 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना हरियाणातील कुरुक्षेत्र परिसरात घडली. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. तरुणाने आत्महत्या केल्यानंतर एका दिवसानंतर त्याचा व्हिसा त्याच्या घरी पोहोचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी तरुणाचा मृतदेह कालव्यात तरंगताना आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुक्षेत्रातील झांसा गावातील विकेश सैनीला पुढील शिक्षणासाठी कॅनडाला जायचे होते. विकेशने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केलं होतं.

Mumbai : ज्या मुलासाठी घर सोडलं त्याच्यामुळे जग सोडावं लागलं, पोलीस कुटुंबाची 'थर्ड डिग्री' टॉर्चर स्टोरी

कॅनडाचा व्हिसा न मिळाल्याने विकेश नाराज असल्याचे पोलिसांनी सांगितले. झांसा स्टेशन प्रभारी राजपाल सिंह यांनी सांगितले की, विकेश 17 ऑगस्टच्या रात्री घरातून बाहेर पडला होता.

सैनीचे कुटुंबीय आणि पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या कुटुंबीयांना त्याची मोटारसायकल आणि चप्पल कालव्याच्या काठावर आढळून आली. शनिवारी शवविच्छेदनानंतर विकेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जर एक दिवस थांबला असता तर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं असतं.

नर्सने बेशुद्धावस्थेत रुग्णासोबत केलं असं कृत्य, थेट तुरुंगात रवानगी; नोकरीही गेली!

मात्र त्याने घाई केली. त्याने पेशन्स ठेवले नाहीत आणि रागातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Haryana, Visa