मुंबई : आई-वडिलांना न सांगता घेतलेले निर्णय कधीतरी धोक्याचे आणि आपल्या तोटाचे ठरू शकतात. असाच धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन तरुणीनं प्रेमासाठी मोठं पाऊल उचललं. मात्र त्याचे गंभीर परिणाम तिला भोगावे लागले. तिच्यावर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली. प्रेमासाठी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तरुणीनं प्रियकारासोबत लग्न केलं आणि नवा संसार थाटला. हातावरची मेहंदी उतरेपर्यंत सगळं काही सुखी संसारासारखं वाटत होतं. मात्र हळूहळू खरे रंग समोर आले. वडील पोलीस दलात चांगल्या हुद्द्यावर असताना त्यांचं काहीही न ऐकता तरुणीनं परस्पर कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानं सासरच्या मंडळींनी नाकारलं. दोघांनी भाड्याच्या घरात नवा संसार थाटला. सगळं काही नीट होईल अशी तिला आशा होती. पण ती आशा फोट ठरली. काही दिवसांनंतर पती आणि सासरच्यांचे खरे रंग समोर आले आणि आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. पतीने मानसिक छळ आणि मारहाण सुरू केली. या त्रासाला कंटाळून पोलिसाच्या मुलीनं आपलं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना चेंबरमध्ये घडली. या प्रकरणी पती आणि कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चेंबरमध्ये राहणाऱ्या मालती दराडे यांच्या फिर्यादीवरून ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यांचे इमारतीत राहणाऱ्या संकपाळ कुटुंबाशी चांगले संबंध होते. मात्र मुलीने प्रेमविवाह केला आणि दोन्ही कुटुंब दुखावली गेली. त्यातच मुलीला पतीकडून छळ होत असल्याने तिने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.