मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नर्सने बेशुद्धावस्थेत रुग्णासोबत केलं असं कृत्य, थेट तुरुंगात रवानगी; नोकरीही गेली!

नर्सने बेशुद्धावस्थेत रुग्णासोबत केलं असं कृत्य, थेट तुरुंगात रवानगी; नोकरीही गेली!

नर्सचं धक्कादायक कृत्य...

नर्सचं धक्कादायक कृत्य...

नर्सचं धक्कादायक कृत्य...

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : एका नर्सने रुग्णालयात भरती केलेल्या महिलेसोबत असं काही केलं तरी तिची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली. याशिवाय महिलेची नोकरीदेखील गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, नर्सने महिला रुग्णाचे 3लाख रुपये चोरी केले. नर्सने आधी 84 वर्षीय महिलेचं एटीएम कार्ड चोरी केलं. यातून पैसे काढून शॉपिंग केली. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर नर्सला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. याशिवाय तिला शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

...म्हणे घर बसल्या Degree देतो, नाशिकमध्ये एकाची 1 लाख 25 हजारांत फसवणूक

द मिररच्या माहितीनुसार, वयस्क महिलेला डिमेन्शियाचा आजार आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान 57 वर्षी नर्स डोरोथी हॉवेलने महिलेचं एटीएम कार्ड चोरलं आणि खात्यातून 2 लाख 83 हजार रुपये काढून घेतले. ज्यावेळी नर्सने हे काम केलं, तेव्हा महिला बेशुद्धावस्थेत होती.

ब्रिटेनमध्ये राहणारी डोरोथी हॉवेल रॉयल स्टोक रुग्णालयात काम करीत होती. रुग्णाच्या एका नातेवाईकाने एटीएममधून पैसे काढल्याची तक्रार पोलिसात केली. ज्यानंतर पोलिसांनी बँकेशी संपर्क केला.

First published:

Tags: Crime news, Private hospitals