Home /News /crime /

घरात घुसून वृद्ध महिलेकडे शरीरसंबंधासाठी मागितली तरुणी; नकार देताच तरुणांनी केलं घृणास्पद कृत्य

घरात घुसून वृद्ध महिलेकडे शरीरसंबंधासाठी मागितली तरुणी; नकार देताच तरुणांनी केलं घृणास्पद कृत्य

या दोन तरुणांनी महिलेच्या झोपडीजवळ गाडी थांबवली आणि झोपडीत घुसून मुलीची मागणी केली.

    जालोर, 17 जानेवारी : Dalit woman murder in Jalore: जालोर जिल्ह्याच्या सांचोर भागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दोन तरुणांनी एक दलित व्यक्तीच्या घरात जाऊन शरीर संबंधांसाठी (Debauchery) मुलीची मागणी केली. घरातील वृद्ध महिलेने जेव्हा याला विरोध केला त्यानंतर तिला कारने (Murder) चिरडून टाकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू (Crime News) झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांचोर भागात नॅशनल हायवेच्या किनाऱ्याजवळ शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. झोपडपट्टी भागात शनिवारी रात्री साधारण 10 वाजता दारूच्या नशेत आलेल्या तरुणाने घरात घुसून वृद्ध महिलेकडे शरीरसंबंधासाठी मुलीची मागणी केली. यावर वृद्ध महिला संतापली. यानंतर तरुणांनी वृद्ध महिलीची कारने चिरडून हत्या केली. हे ही वाचा-संक्रांतीसाठी घरी आलेल्या लेकीला दिली आयुष्यभराची जखम; बापाचं कृत्य वाचून हादराल गडबडीत आरोपी मोबाइल घटनास्थळी विसरले.. आरोपींनी कार रिव्हर्स घेत वृद्ध व्यक्तीच्या अंगावर चढवली. कारची टायर वृद्ध महिलेच्या डोक्यावर चढली. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र यावेळी त्यांचा मोबाइल घटनास्थळीच राहिला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात जात असतानाच वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सहा तासात आरोपींना केली अटक पोलिसांनी घटनास्थळीवरील मोबाइलच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. पुढील सहा तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरात सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. यादरम्यान एक कार झोपडीजवळ आली. यात दोन तरुण होते. तरुणांनी खाली उतरून वृद्ध महिलेकडे मुलीची मागणी केली. यावेळी महिलेने नकार दिला. यामुळे तरुण नाराज झाले. यामुळे रागाच्या भरात तरुणांनी गाडी रिव्हर्स केली. आणि गाडीचा स्पीड वाढवत वृद्ध महिलेला चिरडलं. ज्यात महिलेचा मृत्यू झाला.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Shocking news

    पुढील बातम्या