लखनऊ 31 जुलै : एका मासेमारानं
(Fisherman) मासे पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी पाण्यात जाळं लावून ठेवलं. मात्र, सकाळी पाहिलं असता, या जाळ्यात मासा नाही तर त्याच्या आईचा मृतदेह आढळून
(Woman Found Dead) आला. मासेमारानं लगेचच पोलिसांना
(Police) या घटनेची माहिती दिली आणि हत्येचा संशय व्यक्त करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी
(Post-mortem) पाठवला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या
(Uttar Pradesh) लखनऊमधील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या मलिहाबाद ठाण्याच्या रुसेना गावात मासेमार रामविलास आपली आई, दोन मुले रामनाथ, शामू आणि तीन मुलींसोबत राहात होते. गावाच्या बाहेरच रामविलास यांची आई रामकली भाजीपाल्याचं राखण करण्यासाठी थांबत असे. रामविलास शेताजवळच असलेल्या वाहत्या तलावात मासे पकडण्याचं काम करतात.
एका आजारामुळे पकडला गेला बलात्कार प्रकरणातील आरोपी; तपासात असं फुटलं बिंग
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री रामविलास यांनी शेतात जाऊन आपल्या आईला जेवण दिलं आणि यानंतर मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळं टाकून ठेवलं. यानंतर ते आपल्या घरी गेले. रामविलास सकाळ शेतात पोहोचले तेव्हा त्यांची आई तिथे नव्हती. खूप वेळ वाट पाहूनही आई कुठेच न दिसल्यानं ते पाण्याच टाकलेलं जाळं उचलू लागले. जाळं ओढत असताना ते फार जड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
नागपूरात मित्रानेच मित्राचा केला गेम; दगडानं ठेचून निर्घृण हत्या
काही वेळातच रामविलास यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जाळ्यात मासा नाही, तर त्यांच्या आईचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामविलास यांच्या वडिलांचाही दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांचं नाव छेदा असं होतं. पोलिसांनी सांगितलं, की रात्रीच्या वेळी पाण्यात पडून या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाचा तपास सुरू केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.