Home /News /crime /

यवतमाळ : डॉक्टरचा रुग्ण महिलेवर वारंवार अत्याचार, मधुमेहासाठी घेत होती उपचार

यवतमाळ : डॉक्टरचा रुग्ण महिलेवर वारंवार अत्याचार, मधुमेहासाठी घेत होती उपचार

डॉक्टरने महिलेला एक वर्षभर उपचार घेण्यास सांगितलं आणि यादरम्यान तो तिच्यावर अत्याचार करीत होता.

यवतमाळ, 1 जानेवारी : डॉक्टरकीच्या व्यवसायाला काळिमा फासणारी घटना यवतमाळ (yavatmal crime) शहराच्या उमरसरा परिसरातील निसर्गोपचार केंद्रात घडली आहे. येथे  एका डॉक्टरने महिला रुग्णांवर वारंवार (Crime news) अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याने अश्लील व्हिडीओ काढून तिच्यावर सतत अनैसर्गिक अत्याचार केला. असहाय महिलेने अखेर पोलिसात धाव घेऊन डॉक्टर विरुद्ध तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे.  या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गणेश मुरलीधर साठे असं या डॉक्टरचे नाव असून तो उमरसरा परिसरात वास्तव्याला आहे. पीडित महिलेला मधुमेहचा त्रास असल्याने 2017 साली ती डॉक्टरच्या नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी गेली होती. तेव्हा या डॉक्टरने तिला 12 महिने उपचार घेतल्यानंतरच मधुमेह नियंत्रणात येईल असं सांगितलं होतं. त्यामुळे पीडिता उपचारासाठी या रुग्णालयात जात होती. उपचारादरम्यान तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं जात होतं. त्या अवस्थेत डॉक्टर तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. डॉक्टरने अश्लील व्हिडिओ ही काढले होते. त्या आधारे डॉक्टर साठे हा त्या महिलेचं शोषण करत होता. हे ही वाचा-कोरोना लशीचं कारण सांगून तरुणाची नसबंदी, काही महिन्यांपूर्वीच झालं लग्न याच दरम्यान डॉक्टर तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्याठिकाणी सुद्धा शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणात डॉक्टरची पत्नी सुद्धा त्याला मदत करत होती असं ही पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी डॉक्टर विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून विश्वास ठेवावा तर कोणावर असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Women harasment, Yavatmal crime

पुढील बातम्या