मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

...आणि घरात निपचित पडलेला टेडी बियर अचानक घेऊ लागला श्वास; हालचाल बघून पोलीसही चक्रावले; नेमकं घडलं काय

...आणि घरात निपचित पडलेला टेडी बियर अचानक घेऊ लागला श्वास; हालचाल बघून पोलीसही चक्रावले; नेमकं घडलं काय

टेडी बियर अचानक घेऊ लागला श्वास

टेडी बियर अचानक घेऊ लागला श्वास

पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून तो एका मोठ्या टेडी बेअरमध्ये (Teddy Bear) लपला. टेडी बेअरची हालचाल पाहून पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटू शकला नाही

  इंग्लंड, 13 ऑगस्ट:  एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना अथक परिश्रम करावे लागतात. कधी-कधी छोट्याशा सुगाव्यावरून आरोपींचा माग काढताना पोलिसांच्या बुद्धी व कौशल्याचा चांगलाच कस लागतो. युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) तर कार चोरीतील फरार आरोपीला पकडताना तेथील पोलिसांसोबत असचं काहीसं झालं. एका 18 वर्षांच्या चोरट्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या पत्त्यावर पोहोचले. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून तो एका मोठ्या टेडी बेअरमध्ये (Teddy Bear) लपला. टेडी बेअरची हालचाल पाहून पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. नागपूर: 200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी, मृत्यू
  फरार चोरट्याचं नाव जोशुआ डॉब्सन असं आहे. कार चोरीच्या प्रकरणात वाँटेडच्या यादीत त्याचं नाव होतं. मागील महिन्यात पोलीस अधिकारी त्याला पकडण्यासाठी त्याच्या अड्ड्यावर पोहोचले; पण आसपास तो दिसत नव्हता. तो कदाचित पळून गेला असेल असा पोलिसांचा समज झाला. तो 5 फूट मोठ्या टेडी बेअर या खेळ्यात लपून बसला होता. या बाबतचा मजेदार किस्सा ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी फेसबुकवर शेअर केला आहे. यात एक अधिकारी म्हणाले की, जोशुआला पकडण्यासाठी आम्ही पोहोचलो तेव्हा एका मोठा टेडी बेअर श्वास घेत होता. त्याची हालचालही सुरू होती. या वरून आतमध्ये कुणीतरी आहे याची खात्री झाली. तपासलं तेव्हा जोशुआ लपलेला दिसला. मागील आठवड्यात त्याने चोरी केली होती. अपात्र ठरवलेलं असताना वाहन चालवणं व पंपावर पेट्रोलचे पैसे न देता पळून गेल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आली असून, सध्या त्याला गजाआड करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. फेसबुक पोस्टवर नेटिझन्सकडून भावना व्यक्त ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी टेडी बेअरचा किस्सा फोटोसह फेसबुकवर शेअर केला. यावर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. एका युजरने टेडी बेअरची अवस्था पाहून दु:ख व्यक्त केलं. टेडी बेअरवर अशा प्रकारचा अत्याचार पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा त्यानं व्यक्त केली. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, तुरुंगात आता टेडी बेअरसाठी आवश्यक असणारं साहित्य आणलं असेल. तिसऱ्या युजरने पोलिसांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, टेडी बेअर एका व्यक्तीच्या आकाराचं दिसत नाही, मग चोरटा यात कसा सामावला गेला.
   
  एखादी चोरी किंवा गुन्ह्याचा तपास कसा लावला हे अनेक देशातील पोलिसांकडून सांगितलं जातं. पण यूकेमधील कार चोराला पकडताना घडलेला प्रसंग फेसबुकवर शेअर केल्यानं याबद्दल सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधीच जणू नेटिझन्सना मिळाली.
  First published:

  Tags: Crime, World news

  पुढील बातम्या