मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /जळगावात सैराट! अल्पवयीनं भावाकडून बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या

जळगावात सैराट! अल्पवयीनं भावाकडून बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या

 जळगावात सैराट! रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाने बहिणीला संपवलं, एवढच नाही तर बहिणीच्या प्रियकराचीही त्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

जळगाव : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट घडलं. रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाने बहिणीला संपवलं. एवढच नाही तर बहिणीच्या प्रियकराचीही त्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

प्रेम करणं करण्याचे एवढे वाईट आणि भयंकर परिणाम भोगावे लागतील याची कल्पनाही तरुणीला नसेल. प्रेमी युगुलाला तरुणीच्या अल्पवयीन भावानेच संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.

जळगावच्या चोपडा भागात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. प्रेम प्रकरणातून तरुण-तरुणीची हत्या करण्यात आली. तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तर तरुणीचा गळा घोटून तिला संपवण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

तरुणीच्या अल्पवयीन भावाचे ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हत्या करून त्याने स्वत: पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हत्येची कबुली देखील दिली. त्याचा बहिणीच्या प्रेमाला विरोध होता.

या प्रकरणी अल्पवयीन भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Jalgaon, Maharashtra News, Sairat