शिर्डी 09 मार्च : महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तरूणीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचंही पुढे आलं आहे. ही तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर 8 मार्चला तिचा मृतदेहच आढळून आल्याने धक्का बसला आहे. सात तारखेला शेळ्या चारण्यासाठी ही तरुणी घराबाहेर पडली होती. मात्र ती पुन्हा परतलीच नसल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यातच महिला दिनाच्या दिवशीच तिचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून ती तरुणी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता काल तीचा मृतदेह सापडला आहे. तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा रविवारी रात्री उशिरा अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. उलट त्यात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रात्रभर या तरुणीचा शोध सुरू होता सकाळी तिचा मृतदेह खानापूर परिसरातील झुडुपात सापडला. तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे धोगेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी खास पथक तयार केलं आहे. हे पथक आरोपींचा शोध घेणार आहे. हा कट होता का? परिसरातल्या काही जणांनी हे कृत्यू केलं की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी ही हत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. मराठीत भाषण न केल्याने शिवसेनेकडून अपमान, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या झेनचा आरोप महिलांविरोधातले अत्याचार वाढत असल्याने पोलिसांनी तातडीने करावाई करत गुन्हेगारांवर कारवाई करावी. जोपर्यंत पोलिसांचा धाक वाटणार नाही तोपर्यंत मोकाट गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार नाही अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा… ॲक्सिस बँकेचा उलटा कारभार, शेतकऱ्याविरुद्ध काढलं कोलकाता कोर्टाचं वॉरंट ‘चांदमियां पाटीलांच्या छातीत ‘राम’ नाही तर काळे कुट्ट विष ठासून भरलेय’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.