मेरठ, 25 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पश्चिम उत्तर प्रदेशातील एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंध आणि तंत्र-मंत्राच्या चक्करमध्ये भान हरपलेल्या एका महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलांची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकून दिले. पोलीस तपास हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मीराब आणि कैनन यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. गुरुवारी मेरठ पोलीस ठाण्याच्या दिल्ली गेट परिसरातील खैर नगर परिसरातून दोन मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. 10 वर्षांचा मुलगा मीराब आणि 6 वर्षाची मुलगी कैनन घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा झाला. 6 मुलांची आई, वय 50 अन् 30 वर्षांच्या भाच्यासोबत जुळलं सूत; वाचा, पुढे काय घडलं? पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची आई निशा आणि या भागातील माजी नगरसेवक सौद फैजी यांचे अनैतिक संबंध आहेत. पोलिसांना काही पुरावेही मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दोघांनाही एका डब्यात टाकून वॅगनआर कारमध्ये सलावा येथील गंगा कालव्यात फेकून दिले. निशा तांत्रिकाचे काम करते. परिसरात तिचा दबदबा आहे. तर याआधीही निशाच्या तीन मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्या तीन मुलांचीही त्यांच्या आईनेच हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मुलांच्या हत्येच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.