पुणे, 5 डिसेंबर : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 6 वर्षीय मुलाचे अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने या मुलाला मारहाण केली आहे. तसेच मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर आणखी मारेल, अशी धमकीही या मुलाला देण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुल्ला नगर येथील केंद्रीय विद्यालयात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा सहा वर्षीय मुलगा लुल्ला नगर येथील केंद्रीय विद्यालयात शिकण्यास आहे. फिर्यादी यांच्या मुलाचे अक्षर छान नसल्यामुळे संबंधित शिक्षिकेने त्याला हाताने मारहाण केली. तसेच यानंतर जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला आणखी मारेल, अशी धमकी या शिक्षिकेने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - Pune : रस्त्यावर भिकारी दिसला तर करा 'इथं' संपर्क, त्याचं तातडीनं होईल पुनर्वसन
Pune : पती-पत्नींमध्ये दुरावा वाढला -
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. एकमेकांशी लग्न केलेल्या दोन व्यक्तीचे आयुष्य यानंतर बदलते. परस्परांवरील प्रेम, विश्वास, सहकार्य या गोष्टींवर हे नातं अवलंबून असतं. या गोष्टींची कमतरता असेल तर पती-पत्नीमध्ये खटके उडू लागतात. पती-पत्नींच्या नात्यांना तडा जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पुण्यात तर या विषयावर दर अडीच तासांनी एक तक्रार दाखल होत असल्याची आकडेवारी समोर आलीय. विशेष म्हणजे महिलांप्रमाणेच पुरुषांकडूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत.
बदलत्या काळानुसार घरातली भांडणे सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समुपदेशनाची गरज लोकांना भासते. या प्रकारच्या समुपदेशनासाठी पुणे पोलिसांकडून भरोसा सेल सुरू करण्यात आले आहे. या भरोसा सेलकडं 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये आलेल्या तक्रारींची आकडेवारी समोर आली आहे.
या कालावधीमध्ये विवाहित पती-पत्नीकडून एकूण 3193 अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 328 दिवसांमध्ये हे अर्ज दाखल झाले आहे. याच आकडेवारीनुसार रोज सुमारे 10 तर साधारण अडीच तासांमध्ये एक अर्ज भरोसा सेलमध्ये दाखल होत आहे. यामध्ये महिलांकडून अर्ज दाखल करण्याचं प्रमाण 2406 तर पुरुषांकडून 787 अर्ज दाखल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune crime news, Pune school, School teacher