जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Crime News: ज्या हातांवर काढली बायकोच्या नावाची मेहंदी त्याच हातांनी घेतला जीव, 17 दिवसात संसाराचा भयानक शेवट

Crime News: ज्या हातांवर काढली बायकोच्या नावाची मेहंदी त्याच हातांनी घेतला जीव, 17 दिवसात संसाराचा भयानक शेवट

पतीने पत्नीची हत्या केली (पती-पत्नी प्रतिकात्मक फोटो)

पतीने पत्नीची हत्या केली (पती-पत्नी प्रतिकात्मक फोटो)

विक्रम (विकी) आणि अंजली यांचा विवाह 21 मे 2023 रोजी झाला होता. दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते. 7 जून रोजी विकीने अंजलीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

भोपाळ 08 जून : लग्नानंतर नवरी आणि नवरदेव दोघांचंही आयुष्य बदलून जातं असं म्हणतात. मात्र अनेकदा हा बदल अतिशय भीतीदायक असतो. मध्य प्रदेशमधून सध्या याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील धार नाका येथे राहणारा विक्रम (विकी) आणि अंजली यांचा विवाह 21 मे 2023 रोजी झाला होता. दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते. 7 जून रोजी विकीने अंजलीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ज्या हातावर विकीने अंजलीच्या नावाची मेंदी काढली होती, ते हात अंजलीच्या रक्ताने रंगले होते. आरोपीच्या हातालाही दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदूरजवळील धारा नाका महू येथे राहणाऱ्या विकीने पत्नी अंजलीची चाकूने भोसकून हत्या केली. त्याने अंजलीवर 10 वार केले. गळ्यापासून शरीराच्या अनेक भागांवर चाकूने वार करण्यात आले. अंजलीच्या किंकाळ्या ऐकून विकीच्या कुटुंबीयांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली. त्यांनी पाहिलं तर अंजली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यासोबतच विकीही जखमी अवस्थेत होता. Crime News: मुंबईत प्रियकराकडून सरस्वती वैद्यच्या शरीराचे तुकडे, कुकरमध्ये शिजवत मिक्सरमध्ये फिरवलं मांस दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे अंजलीला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कुटुंबीयांकडून संपूर्ण माहिती घेतली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचवेळी विकीला इंदूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 21 मे 2023 रोजी दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केल्याचं सांगण्यात आलं. विकी पिथमपूर येथील एका कारखान्यात काम करतो. हा विवाह त्याच्या इच्छेविरुद्ध झाला असल्याचं समोर आलं आहे. त्याला अंजलीशी लग्न करायचं नव्हतं. एसपी ग्रामीण हितिका वासल यांनी सांगितलं की, पतीने आपल्या नवविवाहित पत्नीची हत्या केली आणि चाकूने स्वतःलाही जखमी केलं. आरोपीवर उपचार सुरू आहेत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात