Home /News /crime /

अनैतिक संबंधातून गर्भवती महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू; लिव्ह इन पार्टनरला अटक

अनैतिक संबंधातून गर्भवती महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू; लिव्ह इन पार्टनरला अटक

अनैतिक संबंधातून गर्भवती (Pregnanat woman)झालेल्या महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू (beaten to death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे.

    बांका, 28 मार्च: अनैतिक संबंधातून गर्भवती (Pregnant woman) झालेल्या एका महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू (beaten to death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मृत महिलेचं नाव रिक्का देवी असून ती आपला प्रियकर संतोष कुमार भगत याच्यासोबत एकत्र राहत होती. शनिवारी रात्री संबंधित महिलेचा संदिग्ध मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष कुमार भगत याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास केला जात आहे. बिहारच्या मसहरी येथील रहिवासी असणाऱ्या 40 वर्षीय रिक्का देवीचं आरोपी संतोष कुमार भगत याच्याशी अनैतिक संबंध होते. दोघंही एकत्र राहात होते. हत्येच्या दिवशीही दोघं एकत्रच होते. पण रविवारी सकाळी संतोष भगतने संबंधित महिलेची बेदम मारहाण करून हत्या केल्याची माहिती शेजारच्यांना कळाली. त्यानंतर काही जणांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी संतोषला अटक केली. दरम्यान आरोपी संतोषने रिक्की देवीची बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप मृत रिक्काची बहिण रुपा आणि तिच्या भावाने केला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने सांगितलं की, मृत रिक्का देवी पाच महिन्यांची गर्भवती होती. तर आरोपी संतोष भगतच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्याला त्याच्या पत्नीनं सोडून दिलं होतं. त्यानंतर आरोपी संतोष हा रिक्का देवीच्या संपर्कात आला. आणि दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. हे ही वाचा - सख्खा भाऊ पक्का वैरी,भावजयीच्या प्रेमात दीराने सख्ख्या भावाचा गळा चिरून केला खून या प्रकरणी, आरोपी संतोषने सांगितलं की, 'हत्येच्या घटनेच्या वेळी मी झोपेत होतो. दरम्यान काय झालं आणि कसं झालं याबाबत मला काहीही माहित नाही. त्याचबरोबर त्याने हेही सांगितलं की, रिक्कासोबत राहतो म्हणून तिची बहिण रुपा आणि तिचा पती नेहमी माझ्यावर नाराज होते. त्यांनी अनेकदा मला धमक्या दिल्या आहेत, तसेच पैशांचीही मागणी केली होती. सध्या पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या केवळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या संतोष भगतला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Murder

    पुढील बातम्या