Home /News /crime /

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावजयीच्या प्रेमात दीराने सख्ख्या भावाची गळा चिरून केली हत्या

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावजयीच्या प्रेमात दीराने सख्ख्या भावाची गळा चिरून केली हत्या

दीर आणि भावजयीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या अवैध संबंधात (Immoral relation) बाधा ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने गळा चिरून खून (Murder) केला आहे.

    झालावाड, 28 मार्च: दीर आणि भावजयीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या अवैध संबंधात (Immoral relation) बाधा ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने गळा चिरून खून (Murder) केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लहान भावाला अटक केली असून मृत युवकाच्या पत्नीचीही चौकशी केली जात आहे. संबंधित घटनेत मृत युवकाचं नाव बलराम असून आरोपी लहान भावाचं नाव संजय आहे. ते दोघंही राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील सरखंडिया येथील रहिवासी आहेत. आरोपी संजयचे गेल्या काही दिवसांपासून आपल्या भावयजीसोबत अनैतिक संबंध होते. आरोपीचा मोठा भाऊ बलराम या अनैतिक संबंधात बाधा ठरत होता. त्यामुळे भावजयीने आपल्या दीराला 'पतीची विल्हेवाट लाव' असं सांगून आपल्या माहेरी निघून गेली. हे ऐकून लहान भावाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर आरोपी लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला काहीतरी बहाणा करून सरखंडियाच्या जंगलात घेवून गेला. जंगलात गेल्यानंतर आरोपी भावाने परिस्थितीचा अंदाज घेतला. आणि त्याने काही कळायच्या आत आपल्या मोठ्या भावाचा निर्दयीपणे गळा चिरला आणि घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपी भाऊ पोलिसांसोबतही पुन्हा एकदा घटनास्थळी आला होता. त्याला वाटलं आपण पोलिसांना सहज गंडा घालू पण पोलिसांनी मृत युवकाचे कॉल डिटेल तपासले असता, त्यांना लहान भावावर संशय आला. हे ही वाचा- आणखी एक आयशा! पतीनं व्हिडिओ कॉल करत दाखवली गर्लफ्रेंड, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल पोलिसांनी आरोपी भावाची चौकशी केली असता आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिलं. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आरोपी भावाला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात मृत युवकाच्या पत्नीचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Rajasthan

    पुढील बातम्या