Home /News /crime /

क्रूर! माहेरवाशीण महिलेनं केली धाकट्या बहिणीची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी घरातच केलं दफन

क्रूर! माहेरवाशीण महिलेनं केली धाकट्या बहिणीची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी घरातच केलं दफन

माहेरी राहायला आलेल्या महिलेने किरकोळ वादातून (Woman killed her sister and buried her inside home) धाकट्या बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह घरात दफन केल्याची घटना उघडकीला आली आहे.

    लखनऊ, 25 सप्टेंबर : माहेरी राहायला आलेल्या महिलेने किरकोळ वादातून (Woman killed her sister and buried her inside home) धाकट्या बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह घरात दफन केल्याची घटना उघडकीला आली आहे. किरकोळ कारणावरून झालेला वाद विकोपाला (Murder for ordinary dispute) गेल्यानंतर महिलेने धाकट्या बहिणीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला ठार केले. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि घरातच खड्डा खणून तो पुरून टाकला. ही घटना उघडकीला आल्यावर सर्वांनाच जबर धक्का बसला. किरकोळ कारणावरून वाद उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील किरण नावाच्या महिलेचं लग्न झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती राहायला माहेरी आली होती. तिची 12 वर्षांची छोटी बहीण गायत्रीसोबत सतत भांडणं होत होती. किरकोळ कारणावरून झालेलं भांडण विकोपाला गेलं आणि ते हाणामारीवर पोहोचले. रागानं बेभान झालेल्या किरणनं घरातील वरवंटा घेऊन गायत्रीच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. घाव वर्मी लागल्यामुळे त्यात गायत्रीचा मृत्यू झाला. घरात पुरला मृतदेह किरण आणि गायत्री यांचे वडील कल्लू रावत हे मजुरीचं काम करतात. कामानिमित्त ते अनेक दिवस घराबाहेर असतात. घरात इतर कुणी नसल्याचा गैरफायदा घेत किरणनं खड्डा खोदला आणि गायत्रीचा मृतदेह एका पोत्यात भरून खड्ड्यात दफन केला. बुधवारी रात्री गायत्रीचा खून केल्यानंतर शुक्रवारी ही घटना उघडकीला आली. हे वाचा - Yuck! इथे लघवीत उकडून आवडीनं खाल्ली जातात अंडी; सांगितलं अजब कारण असा लागला शोध गायत्री दोन दिवसांपासून घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. गायत्रीचा सर्वत्र शोध सुरू होता. ज्या ठिकाणी गायत्रीचा मृतदेह दफन करण्यात आला होता, त्या ठिकाणाहून दुर्गंधी यायला लागल्यामुळे तो भाग खणण्यात आला. तिथून पोलिसांना गायत्रीचा मृतदेह मिळाला. किरण फरार आपल्या बहिणीच्या हत्येचा सुगावा लागणार असल्याची जाणीव होताच किरण फरार झाली. पोलिसांची आणि घरच्यांची नजर चुकवून तिने घरातून पळ काढला. पोलिसांनी किरणविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. लवकरच किरणला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Murder, Uttar pardesh

    पुढील बातम्या