मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

टेस्ट ड्राईव्ह उठली जिवावर! कारला दिली धडक, दोन बाईकस्वारांनाही उडवलं

टेस्ट ड्राईव्ह उठली जिवावर! कारला दिली धडक, दोन बाईकस्वारांनाही उडवलं

 ड्रायव्हिंग येत नसताना भर रस्त्यावर घेतलेली टेस्ट ड्राईव्ह (test drive) इतर निष्पाप प्रवाशांना (other commuters) चांगलीच महागात पडली.

ड्रायव्हिंग येत नसताना भर रस्त्यावर घेतलेली टेस्ट ड्राईव्ह (test drive) इतर निष्पाप प्रवाशांना (other commuters) चांगलीच महागात पडली.

ड्रायव्हिंग येत नसताना भर रस्त्यावर घेतलेली टेस्ट ड्राईव्ह (test drive) इतर निष्पाप प्रवाशांना (other commuters) चांगलीच महागात पडली.

  • Published by:  desk news

ग्वालियर, 22 ऑगस्ट : ड्रायव्हिंग येत नसताना भर रस्त्यावर घेतलेली टेस्ट ड्राईव्ह (test drive) इतर निष्पाप प्रवाशांना (other commuters) चांगलीच महागात पडली. भरधाव वेगात आलेल्या या कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक (dash) दिली. त्यानंतर तिथून पळ काढण्याच्या नादात वेग (over speeding) वाढवला. त्यामुळे आणखी दोन बाईकस्वारांना (two bikes) या कारची धडक बसून ते जखमी (injured) झाले.

अशी घडली दुर्घटना

मूळचे झाशीचे असणारे नरेंद्र पटेरिया काही कामानिमित्त ग्वालियरला आले होते. शनिवारी रात्री ग्वालियरमध्ये त्यांच्या कारला पाठिमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात पटेरियांच्या कारचं मोठं नुकसान झालं आणि त्यांना किरकोळ जखमाही झाल्या. काही समजायच्या आतच धडक दिलेल्या कारने थोडा रिव्हर्स घेतला आणि पुन्हा तुफान वेगाने ती कार तिथून निघून गेली. एक महिला ही कार चालवत असल्याचं पटेरिया यांनी पाहिलं. मात्र इतर तपशील समजण्याअगोदरच ती कार नजरेसमोरून निघून गेली.

चुकांवर चुका

या अपघातात पकडले जाऊ नये, यासाठी कारमधील महिलेने गाडीचा वेग वाढवला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याने चाललेल्या एका दुचाकीला कारची धडक बसली, तर आणखी एका दुचाकीला कारने कट मारला. त्यानंतर कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका रेलिंगला जाऊन धडकली. त्यात कारचे मोठे नुकसान झाले, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.

नातेवाईक गेले पळून

कार रेलिंगला धडकून बंद पडल्यानंतर कारमधील सर्व नातेवाईक उतरून पळून गेले. ड्रायव्हिंग येत नसलेल्या एका महिलेला टेस्ट ड्राईव्हसाठी ही कार देण्यात आल्यामुळे असा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारच्या नंबरवरून पोलीस कारमालकाचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचा - ‘ती’ गोड बोलून फसवायची, ‘तो’ व्हिडिओ बनवून FIR ची धमकी द्यायचा!

टळली मोठी दुर्घटना

ही घटना घडली, तेव्हा रस्त्यावर मोठी वर्दळ होती. अनेक वाहनं आणि पादचारी रस्त्यावर होते. मात्र या घटनेत तिघे जखमी झाले असले तरी कुणाच्याही जिवाला धोका पोहोचू शकला असता. मात्र सुदैवाने हे टळल्याची चर्चा सध्या ग्वालियरमध्ये सुरु आहे.

First published:

Tags: Accident, Gwalior, Road accident