• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • ‘ती’ गोड बोलून फसवायची, ‘तो’ व्हिडिओ बनवून FIR ची धमकी द्यायचा! रिअल लाईफमधील बंटी-बबली गजाआड

‘ती’ गोड बोलून फसवायची, ‘तो’ व्हिडिओ बनवून FIR ची धमकी द्यायचा! रिअल लाईफमधील बंटी-बबली गजाआड

परिसरातील ज्येष्ठ (senior citizens) आणि सधन नागरिकांना (rich citizens) ब्लॅकमेल (blackmail) करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला (gang) पोलिसांनी (police) जेरबंद केलं आहे.

 • Share this:
  इंदूर, 22 ऑगस्ट : परिसरातील ज्येष्ठ (senior citizens) आणि सधन नागरिकांना (rich citizens) ब्लॅकमेल (blackmail) करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला (gang) पोलिसांनी (police) जेरबंद केलं आहे. एक तरुण आणि त्याची मैत्रिण हे गोड बोलून ज्येष्ठ नागरिकांसोबत मैत्री करायचे, मग त्यांना एकांतात बोलवायचे आणि त्यांचं व्हिडिओ शूटिंग करायचे. त्यानंतर ते शूटिंग दाखवून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळायचे. नागरिकही नाहक बदनामी टाळण्यासाठी त्यांना पैसे द्यायचे. असं करायचे काम मध्यप्रदेशमधल्या इंदूरमधील आकाश नावाचा तरूण एका जिममध्ये इनस्ट्रक्टरचं काम करत होता. या जिममध्ये येणाऱ्या अंजली नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. काही दिवसांतच ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. या दोघांनी झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्यासाठी एक योजना आखली. ही तरूणी ज्येष्ठ नागरिकांसोबत ओळख वाढवून त्यांना एखाद्या ठिकाणी घेऊन जायची आणि तरुण त्या दोघांचे व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेल करायचा. असे फुटले बिंग इंदूरमधील एलआयसी एजंट असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला तरुणीने फोन केला आणि आपल्याला विमा काढण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानंतर शहरातील मेघदूत पार्कमध्ये भेटायला बोलावले. तिथे पोहोचल्यानंतर तरुणीने आपण सकाळपासून काहीच खाल्ले नसल्याचं सांगितलं. त्यानंतर ही व्यक्ती तिला ज्यूस पाजण्यासाठी एका ज्यूस सेंटरवर घेऊन गेली. तरुणी ज्यूस पित असताना तिच्याशी हे गृहस्थ बोलत बसल्याचा व्हिडिओ तरुणाने मोबाईलमध्ये शूट केला आणि जवळ येऊन थेट या गृहस्थांच्या कानशिलात लगावत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. हे वाचा -ठाण्यातील ज्वेलर्स भरत जैन हत्या प्रकरणात मोठी अपडेट या प्रकारामुळे धक्का बसलेल्या गृहस्थांनी आपल्या मुलाकडून दोन लाख रुपये मागवले आणि त्या तरुणाला दिले. त्यानंतर घरी जाऊन घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांच्या मुलाने पोलिसांत धाव घेत हा प्रकार सांगितला. पोलिसांनी केस नोंदवून तरुणीच्या मोबाईल नंबरच्या आधारे लोकेशन शोधत तिला आणि तरुणाला अटक केली. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: