लखनऊ 18 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या तब्बल 28 वर्षांनंतर महिलेनं सावत्र वडिलांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या वेळी ती 7 वर्षांची होती. माजी लष्करी अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या 35 वर्षीय महिलेनं पोलिसांना सांगितलं की, ती 19 वर्षांची होईपर्यंत तिचा लैंगिक छळ सुरूच होता. तिच्या तक्रारीच्या आधारे आता अलीगडमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. परराज्यातील तरुणीकडून हॉटेलवर वेश्या व्यवसाय, उस्मानाबादेत 2 हॉटेलवर 4 मुलींची सुटका महिलेनं दावा केला की तिने संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली आणि पोटदुखीची तक्रार केली. ‘पण माझ्या आईने मला काही औषधं दिली आणि गप्प बसायला सांगितलं.’ मग दुसर्या सावत्र काकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि हे वारंवार सुरूच राहिलं. महिलेचा आरोप आहे की, वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. ती म्हणाली, ‘मी शक्य तितकं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जबरदस्ती सुरूच ठेवली.’ महिलेचं जानेवारी 2011 मध्ये लग्न झालं होतं. ती म्हणाली, ‘लग्नानंतर जेव्हा मी माझ्या आईला भेटायला घरी गेले तेव्हा माझ्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण मी प्रतिकार केला.’ दोन अल्पवयीन मुलींची आई असलेल्या या महिलेनं सांगितलं की, तिला या आघाताचा सामना करता आला नाही. शेवटी तिने आपल्या पतीला याबद्दल माहिती दिली. ती म्हणाली की , ‘त्याने मला पाठिंबा दिला आणि माझ्या शोषणाविरुद्ध लढण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं.’ VIDEO : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS व्हायरल, 8 जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न; विद्यापीठात मोठा गोंधळ ‘यंदा 11 एप्रिलला माझा नवरा मला माझ्या सावत्र वडिलांच्या घरी या प्रकरणावर बोलण्यासाठी घेऊन गेला. मात्र माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि वडिलांचं समर्थन केलं. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आता मला माझ्या पतीचा पाठिंबा असून मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार आहे,’ असं महिलेनं सांगितलं. या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.