मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नोकरीचं आमिष दाखवून बुवाचा महिलेला 38 लाखांना गंडा; 'ऑनलाईन हवन'च्या नावाने उकळले पैसे

नोकरीचं आमिष दाखवून बुवाचा महिलेला 38 लाखांना गंडा; 'ऑनलाईन हवन'च्या नावाने उकळले पैसे

10 वर्षांपासून बेरोजगार असलेल्या आणि बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला (Woman) ‘गॉडमॅन’ (Godman) अशी ओळख सांगणाऱ्या एका बदमाशाने तिच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन चार वर्षांत तिची तब्बल 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

10 वर्षांपासून बेरोजगार असलेल्या आणि बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला (Woman) ‘गॉडमॅन’ (Godman) अशी ओळख सांगणाऱ्या एका बदमाशाने तिच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन चार वर्षांत तिची तब्बल 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

10 वर्षांपासून बेरोजगार असलेल्या आणि बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला (Woman) ‘गॉडमॅन’ (Godman) अशी ओळख सांगणाऱ्या एका बदमाशाने तिच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन चार वर्षांत तिची तब्बल 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 7 डिसेंबर : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या संकटात लॉकडाउनच्या काळात (Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. या आर्थिक संकटाने खचलेल्या काहींनी आत्महत्येचाही मार्ग स्वीकारला. काही जणांनी या संकटावरही मात केली. या सगळ्या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या व्यक्तींचा काही भोंदू व्यक्तींनी गैरफायदाही घेतला. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. 10 वर्षांपासून बेरोजगार असलेल्या आणि बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला (Woman) ‘गॉडमॅन’ (Godman) अशी ओळख सांगणाऱ्या एका बदमाशाने तिच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन चार वर्षांत तिची तब्बल 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तिच्यासाठी ऑनलाइन हवन (Online Havan) केलं, तर तिच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात, असं आश्वासन त्याने तिला दिलं. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी या महिलेने त्याला होकार दिला आणि तिचे सर्व दागिने, तिची सर्व बचत या तथाकथित ‘गॉडमॅन’कडे दिली; मात्र कोणतीही समस्या सुटली नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली.

    या सगळ्या प्रकरणाबाबत माहिती देताना MHB कॉलनी पोलिसांनी (Police) सांगितलं, की मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागात (Borivali West) ही महिला आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहते. बऱ्याच दिवसांपासून ती बेरोजगार (Jobless) होती. 2018 मध्ये टीव्हीवर एक जाहिरात आली. त्यात एका धर्मगुरूने नागरिकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा दावा केला होता. त्यांच्यासाठी ऑनलाइन हवन करण्याचं आश्वासन दिलं होतं. ती जाहिरात बघून भुललेल्या या महिलेनं जाहिरातीत दिलेल्या नंबरवर फोन केला आणि त्या माणसाला तिला मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर आतापर्यंत जवळपास 4 वर्षांच्या कालावधीत त्या माणसाने 'ऑनलाईन हवन' करण्याचं वचन देऊन वारंवार पैसे घेतले. चार वर्षांत त्याने तब्बल 38 लाख रुपये उकळले; मात्र इतक्या वर्षांत काहीही घडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर 'हा खराच माणूस आहे का' याचा शोध घेण्यासाठी 27 नोव्हेंबरला या महिलेने अयोध्येला (Ayodhya) प्रयाण केले. तिथे गेल्यावर तिच्या लक्षात आलं, की असं ‘ऑनलाईन हवन’ करणारा कोणताही गॉडमॅन नाही. तेव्हा ही महिला मुंबईत परतली आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

    जितेंद्र आव्हाडांनी घालून दिला आदर्श, मुलीचे केले रजिस्टर लग्न!

    पोलीस या महिलेची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत असून, गुन्हेगाराला पकडण्यासाठी काही पुरावे शोधण्यासाठी वेबसाईट तपासली जात आहे. अशा प्रकारच्या घटना याआधीही घडल्या आहेत. नोकरी नसल्याने हताश झालेल्यांच्या मनःस्थितीचा फायदा घेऊन अशा भोंदूंनी पैसे किंवा मौल्यवान वस्तू लुटल्या आहेत. तसंच ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाणही वाढलं आहे. पुण्यातल्या (Pune) एका महिलेची वेबसाइटवरून (Online Website) जेवण ऑर्डर करताना 60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ही 46 वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जेवण ऑर्डर करण्यासाठी ऑनलाइन चांगलं रेस्टॉरंट शोधण्याचा प्रयत्न करत असताना तिला भामट्यानी गंडा घातला.

    नव्या वर्षांत पुन्हा 6 नवीन मालिका! 2021 Year End लाच होणार धमाकेदार एंट्री

    सध्या घरबसल्या काम करण्यासाठी ऑनलाईन काम (Online Work- Work from Home) शोधत असलेल्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा फायदा अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्ती घेत आहेत. मुंबईतल्या बोरिवली भागातल्या एका गृहिणीचं सायबर-फसवणुकीत 2.33 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. तिला अॅमेझॉन कंपनीमध्ये (Amazon) घरून कामाची ऑफर देऊन सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) तिची फसवणूक केली. आजकाल अशा सायबर फसवणुकीचं प्रमाण वाढलं असून, लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या लिंक्स, आकर्षक जाहिराती यांना बळी पडू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

    First published:

    Tags: Crime news, Mumbai