पुणे, 8 मार्च, प्रतिनिधी : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी दिलेल्या धडकेत वानवडीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. भररस्त्यावर रिल्स बनवत असताना मोटारसायकलने बाजूने चालेल्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तस्लिमा पठाण वय 31 असं मृत महिलेचं नाव आहे.
स्टंटबाजी महिलेच्या जीवावर बेतली
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयान शेख आणि झायद शेख असं या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तरुणांचं नाव आहे. या तरुणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झायद हे दोघेही जण बाईकवर स्टंट करत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवत होते. यावेळी तस्लिमा पठाण या रस्त्यावर दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी आयान शेख हा बाईक चालवत रिल्स बनवण्यासाठी स्टंट करत होता तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हिडिओ काढत होता. दरम्यान, यावेळी आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली.
शालीवरून झाला पुण्यातील चिमुरडीच्या हत्येचा उलगडा; प्रियकराला त्रास होतो म्हणून आईनेच...
दोघांना अटक
या धकडकेत पठाण या खाली पडल्या, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे गतिमान करून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या या तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune crime, Pune news