मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पालघर साधू हत्याकांड: CID चौकशीनंतर जंगलात गेलेला तरुण घरी परतलाच नाही

पालघर साधू हत्याकांड: CID चौकशीनंतर जंगलात गेलेला तरुण घरी परतलाच नाही

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलं आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलं आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलं आहे.

पालघर, 9 जून: पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलं आहे. हत्याकांड प्रकरणी सीआयडीने (CID) चौकशीसाठी बोलावलेल्या 32 वर्षीय तरुणाने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विणश धर्मा धांगडा (रा.दिवशी, चिंचपाडा) असं या तरुणाचं नाव आहे. हेही वाचा.. 15 ऑगस्टनंतरही शाळा सुरू होणार की नाही, केंद्र सरकारनं केला मोठा खुलासा पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी सीआयडीने 11 मे रोजी विणशचा जबाब नोंदवण्यासाठी चिंचपाडा येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला बोलवलं होतं. मात्र, या प्रकरणात विणशचा सहभाग नसल्याचं लक्षात आल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिलं होतं. परंतु, आता पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागणार या भीतीने विणश यानं जंगलात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. आरोपी भेटले नाही तर गावातील सर्वांना अटक करू, अशी धमकी पोलिसांकडून वारंवार देण्यात येत असल्याची माहिती विणशच्या पत्नीनं दिली आहे. या प्रकरणी कासा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 4 चिमुकल्यांचं बापाचं छत्र हरपलं... विणशचं 12 वर्षांपूर्वी गावातील रशीदा हिच्याशी विवाह झाला होता. त्याला 4 मुलं आहेत. विणश यांन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यांमुळे चारही चिमुकल्याच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं आहे. विणशच्या घरची परिस्थिती अत्यंत हलकी आहे. आता चार मुलांचं संगोपन कसं करायचं असा प्रश्न रशीदा समोर उभा ठाकला आहे. हेही वाचा.. कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास गडचिंचले 16 एप्रिलला काय घडलं? पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची चोर समजून जमावाकडून निर्घृन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सदर तपास आता सीआयडीकडे असून अनेकांचे जबाब घेण्याचं काम सुरु आहे. संपादन- संदीप पारोळेकर
First published:

Tags: Palghar

पुढील बातम्या