पॅरिस, 25 फेब्रुवारी : बलात्काराच्या घटना भारतातच नाहीत तर जगभरातील कित्येक देशात घडतात. काही वेळा तर हे रेपिस्ट पोलिसांच्या तावडीतही सापडत नाही. सापडले तरी त्यांना शिक्षा मिळेपर्यंत खूप कालावधी जातो किंवा ते शिक्षेतून मुक्तही होतात. असंच एक बलात्काराचं प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे, ज्यात पीडितेने स्वतःच बलात्काऱ्याला भयंकर शिक्षा दिली. तिने अशी शिक्षा दिली की तोच पुरावा म्हणून तिने पोलिसांना दिला. पीडित महिलेचं कृत्य पाहून पोलीसही हादरले. महिलेने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अशी शिक्षा दिली की तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही. फ्रान्समधील ही घटना आहे. एविगन्न शहरात राहणारी ही महिला आपल्या श्वानाला फिरवण्यासाठी बाहेर घेऊन गेली होती. त्यावेळी एका अज्ञान व्यक्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक! रस्त्यावरील भटक्या Puppy ला नवऱ्याने घरी आणलं, बायकोचा मृत्यू; असं काय घडलं? त्याने तिचे कपडे खेचले, तिला जबरदस्ती मिठी मारली आणि किस करण्याचाही प्रयत्न केला. तुम्हाला हे वाचून ते दृश्य डोळ्यासमोर येताच अंगावर काटा आला असेल, तळपायातील आग मस्तकात गेली असेल. विचार करा प्रत्यक्ष याचा सामना करणाऱ्या त्या महिलेचं काय झालं असेल. तिने त्या व्यक्तीचा प्रतिकार केला, त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केले. पण ती व्यक्ती तिला सोडतच नव्हती. अखेर महिलेलाही राग आला आणि संधी मिळताच तिने आपल्या दातांनी त्याची जीभच चावली. त्याच्या जिभेचा तुकडा तिने पाडला. बलात्कार करणाऱ्या या व्यक्तीची चावलेला जिभेचा तुकडा घेऊन महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. पुरावा म्हणून तिने तो पोलिसांना दिला. असा पुरावा पाहून पोलीसही हादरले. गर्लफ्रेंडने दिलं असं गिफ्ट की पालटलं बॉयफ्रेंडचं नशीब; तुम्हीही म्हणाल, ‘GF असावी तर अशी’ डेली मेलच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. तपासात तो ट्युनिशियाचा राहणारा आहे आणि फ्रान्समध्ये बेकायदेशीररित्या राहत असल्याचं समोर आलं. फ्रान्स सरकारनेही त्याला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.