Home /News /crime /

पळून गेलेल्या दीर आणि वहिनीची आत्महत्या, रेल्वेखाली दिला जीव

पळून गेलेल्या दीर आणि वहिनीची आत्महत्या, रेल्वेखाली दिला जीव

काही दिवसांपूर्वी ते दोघं घरातून पळून गेले होते. त्यांना शोधून परत आणल्यानंतर निराशेच्या गर्तेत सापडलेल्या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.

    करनाल, 6 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेलेल्या दीर आणि त्याच्या वहिनीनं रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघड झाली आहे. लग्नाला 12 वर्षं झाल्यानंतर आपल्या दीरासोबत पळून जाण्याचा निर्णय महिलेनं घेतला होता. मात्र त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की दोघांचंही मनःस्वास्थ्य त्यामुळे बिघडलं आणि त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. वहिनीसोबत प्रेमप्रकरण हरियाणातील करनाल परिसरात राहणाऱ्या परमजीत नावाच्या महिलेचं 12 वर्षांपूर्वी मनोजसोबत लग्न झालं होतं. त्यांना 3 मुलंदेखील आहेत. काही महिन्यांपूर्वी परमजीत आणि मनोजचा धाकटा भाऊ अमन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी घरातून पळून जाऊन एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पळून गेल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांन 15 दिवसांतच त्यांना शोधून काढून घरी आणलं होतं. त्यानंतर परमजीत आपल्या मुलांसोबत राहत होती, तर अमनला घरातून हाकलून देण्यात आलं होतं. आत्महत्येचा निर्णय प्रेमप्रकरण फसल्यामुळे आणि समाजात होणारी बदनामी सहन न झाल्यामुळे दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर गेले आणि रेल्वेखाली आपला जीव दिला. आत्महत्येपूर्वी काही दिवस दोघंही घरातून गायब झाले होते. घटनेच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर एका पुरुषाचं शव पडल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्याच्यासोबत एक महिलादेखील मृत्यूमुखी पडल्याचं सांगण्यात आलं. कुटुंबीयांकडून खातरजमा केली असता अमन आणि परमजीत या दोघांचेच मृतदेह असल्याची खात्री पटली. हे वाचा- मुलाच्या 7व्या वाढदिवसानिमित्त आईनं काढला Nude Photo, पडला चांगलाच भुर्दंड पोलीस तपास सुरू दोघांनीही आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी सिद्ध होत असलं तरी त्यामागे आणखी काही कारण आहे का , याचा पोलीस शोध घेत आहेत. दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Love story, Police, Sucide, Train

    पुढील बातम्या