मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कुछ भी! मुलाच्या 7व्या वाढदिवसानिमित्त आईनं काढला Nude Photo, पडला चांगलाच भुर्दंड

कुछ भी! मुलाच्या 7व्या वाढदिवसानिमित्त आईनं काढला Nude Photo, पडला चांगलाच भुर्दंड

आपल्या मुलाच्या वाढदिवशी आई काय काय करत असते! पण एका आईनं या दिवशी असं काही केलं की तिला थेट तुरुंगातच जावं लागलं.

आपल्या मुलाच्या वाढदिवशी आई काय काय करत असते! पण एका आईनं या दिवशी असं काही केलं की तिला थेट तुरुंगातच जावं लागलं.

आपल्या मुलाच्या वाढदिवशी आई काय काय करत असते! पण एका आईनं या दिवशी असं काही केलं की तिला थेट तुरुंगातच जावं लागलं.

घाना, 5 डिसेंबर: मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका अभिनेत्रीनं त्याच्यासोबत न्यूड फोटो काढला आणि तो व्हायरल झाल्यावर त्याचा भुर्दंडही तिला सोसावा लागला. आपल्या मुलाचा वाढदिवस हा प्रत्येक आईसाठी खास असतो. या दिवशी काय करायचं, याचे बेत आखताना फारच विचार केला जातो आणि कित्येक दिवस अगोदर प्लॅन करून कार्यक्रम ठरवले जातात. मुलाला जास्तीत जास्त आनंद देता येईल आणि त्याच्यासोबत वेळ घालवता येईल, याचा बेत प्रत्येक आई करत असते. मात्र घानामधील एका अभिनेत्रीनं मात्र जो प्रकार केला, तो तिच्या चांगलाच अंगलट आला.

मुलासोबत न्यूड फोटो सेशन

घानामधील प्रसिद्ध अभिनेत्री रोजमंड ब्राऊन हिनं मुलाच्या वाढदिवशी त्याच्यासोबत न्यूड फोटोशूट केलं. 32 वर्षींची रोमा केवळ एवढंच करून थांबली नाही, तर याचे फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केले. बघता बघता हे फोटो व्हायरल झाले आणि तिच्यावर सर्व बाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली. या फोटोत रोजमंड पूर्णतः नग्न असून तिच्या मुलाने केवळ अंडरविअर घातल्याचं दिसतं.

मिळाली 3 महिन्यांची शिक्षा

रोजमंडच्या या कृत्यामुळे जनमानसात एवढा संताप निर्माण झाला की अनेकांनी तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. अनेकांनी न्यायालयात खटले भरले. न्यायालयानं तिच्यावरील आरोप मान्य करत तिला 3 वर्षांची शिक्षा सुनावली घरगुती हिंसाचार आणि इंटरनेटवर अल्पवयीन मुलाचे अश्लिल फोटो टाकण्याचे गुन्हे तिच्याविरोधात दाखल करण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला रोजमंडनं वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिलं. मात्र तिथंही तिच्या पदरी निराशाच पडली.

हे वाचा- डोंबिवलीनंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, राज्याची चिंता वाढली

मुलाचा घेतला निरोप

शिक्षा निश्चित झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर मुलाचा फोटो पोस्ट करत त्याला भावनिक निरोप दिला. मी तीन महिन्यांनी परत येईल, तोपर्यंत स्वतःची काळजी घे, असा निरोप तिने मुलासाठी पोस्ट केला. तर तुरुंगवास झाल्याशिवाय अशा प्रवृत्तींना चाप बसणार नाही, असा शेरा न्यायमूर्तींनी लगावला आहे.

First published:

Tags: Mother, Photo, Son