राजस्थान, 10 जुलै : जयपुरमध्ये पुन्हा एकदा लग्नापूर्वी नवरी पळून गेल्याची (The bride ran away before the wedding in Jaipur) घटना समोर आली आहे. ही नवरी महाराष्ट्रातील होती. लग्नासाठी ती जयपूरला आली होती. मात्र लग्नापूर्वीच नवरी बाल्कनीमध्ये ओढणीने खाली उतरून फरार झाली. सकाळी नवरी सापडली नाही, म्हणून नवरदेवाने पोलीस ठाण्यात तक्रार केली.
लग्नाचं होत नव्हतं...
बगरूमधील धोबींच्या परिसरात राहणारा राजेश शर्मा हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. बऱ्याच काळापासून त्याच्या लग्नात अडचणी येत होत्या. दोन महिन्यांपूर्वी गणेश नारायण शर्मा या व्यक्तीसोबत त्याची भेट झाली. गणेशने त्यांना आश्वस्त केलं आणि महाराष्ट्रातून ब्राम्हणाची मुलगी मिळेल असं वचन दिलं. राजेशने घरी जाऊन कुटुंबाशी बातचीत केली. लग्नाचं ऐकून घरातले देखील तयार झाले. दोन्ही पक्षामध्ये गाठीभेटी झाल्या आणि लग्नाचं नक्की करण्यात आलं.
हे ही वाचा-हुंड्यासाठी करायचा बायकोचा छळ; कोर्टाचे अभिनेत्याला शरण येण्याचे आदेश
नवरी निवडण्यासाठी मुलींची रांग..
लग्नाचं नक्की झाल्यानंतर गणेश त्यांच्याकडे अनेक मुलींना घेऊन आला. राजेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलींपैकी दीपाली नावाची मुलगी पसंत केली. दीपालीचे वडील जगन्नाथ राय यांच्यासोबत मुलाच्या कुटुंबीयांनी बातचीत केली. यावेळी गणेश शर्मा, विक्की शर्मा, मोहम्मद नजीर वकीलने लग्नासाठी 1.80 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी राजेशने आपल्या आईच्या खात्यामधून पैसे काढून दिले. याशिवाय त्यांनी सांभर न्यायालयात जाऊन 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिखित स्वरुपातही घेतलं.
सप्तपदीपूर्वीच नवरी फरार
स्टॅम्प पेपरवर सर्व लिखित घेतल्यानंतर मुलाचं कुटुंबीय नवरीला घेऊन बगरू येथे आले. दीपाली ही राजेश शर्मासोबत घरात राहू लाहली होती. 20 जून रोजी मंदिरात विधीवत लग्न ठरलं होतं. 19 जून रोजी संपूर्ण कुटुंब झोपेत होतं. त्याचवेळी रात्री 12 ते 3 च्या दरम्यान दीपाली बाल्कनीला ओढणी बांधून खाली उतरली. सकाळी पाहिलं तर ती खोलीत नव्हती. राजेश शर्माने तीनही दलालांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. दलालांनी त्यांना धोका दिल्याचं शेवटी उघड झालं. यानंतर दलालांशीही संपर्क झाला नसल्याचं नवरदेवाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jaipur, Maharashtra, Marriage, Money fraud, Wedding