भोपाळ, 4 एप्रिल : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भिंड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला. मुलीच्या सासरच्यांना फसवण्यासाठी पत्नीने आपल्याच मुलाकडून पतीची हत्या केली. मुलाने वडिलांनाच गोळी घातली. पतीला रस्त्यातून हटवण्यासाठी पत्नीने मुलगा आणि त्याच्या मित्रांसह हत्येचं कारस्थान रचलं. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी फोनवरुन कोणासोबत बातचीत करीत होते. जी बाब पतीला आवडत नव्हती. यासाठी पतीला रस्त्यातून हटवण्यासाठी प्लान करण्यात आला. पत्नीचे दुसऱ्यासोबत अवैध संबंध होते. आता पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. 26 आणि 27 मार्च दरम्यान रात्री बीएसएनएल ऑफिसच्या मागे जगत सिंह बघेलची त्याच्या घराच्या मागे गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं की, राजीव बघेल, संजय बघेल आणि रंजीत बघेल (जे तिच्या मुलीची सासरची मंडळी आहेत) यांनी गोळी मारून ही हत्या केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी मृत व्यक्तीच्या पत्नीचे कॉल डिटेल्स आणि सीडीआर काढण्यात आली. हत्येत सांगितल्या गेलेल्या तीन आरोपींपैकी एक भोपाळचा आहे. तर अन्य घटनास्थळी हजर नव्हते. घटनेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने हा तपास सुरू केला आणि कुटुंबीयांवर लक्ष ठेवणं सुरू केलं. यादरम्यान पोलिसांना एक सूचना मिळाली की, रामु राठोड बंदूक विकण्याच्या तयारीत आहेत. त्यावेळी त्याला पकडण्यात आलं. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, 26 मार्च रोजी मृत जगत सिंह बघेल यांचा मुलगा हेमंत बघेल आणि त्याचा मित्र सुग्रीव राठोड बंदूक आणि जिवंत काडतुसं खरेदी करण्यासाठी गेले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. हे ही वाचा- रेव्ह पार्टीचा भांडाफोड, अभिनेत्याची मुलगी अन् बिग बॉस विजेत्यासह 142 जणांना अटक ज्यानंतर हेमंत बघेलने सांगितलं की, या हत्येची सूत्रधार त्याची आईच आहे. तिने आपल्या मुलीच्या सासरच्यांना अडकवण्यासाठी पती जगत सिंह बघेल याची मुलाकरवून हत्या घडून आणली होती. पोलिसांनी जगत सिंह बघेलच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी आणि मुलगा हेमंल बघेल यासह त्याचा मित्र सुग्रीवला अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.