Home /News /entertainment /

हैद्राबादमध्ये रेव्ह पार्टीचा भांडाफोड, अभिनेत्याची मुलगी अन् बिग बॉस विजेत्यासह 142 जणांना अटक

हैद्राबादमध्ये रेव्ह पार्टीचा भांडाफोड, अभिनेत्याची मुलगी अन् बिग बॉस विजेत्यासह 142 जणांना अटक

आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

    हैद्राबाद, 3 एप्रिल : हैद्राबाद (Hyderabad News) पोलिसांच्या टास्क फोर्स टीमने बंजारा हिल्सच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील एका पबमध्ये रविवारी रेव्ह पार्टीचा भांडाफोड केला. यात व्हीआयपी, अभिनेत्यांसह अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांसह तब्बल 142 लोकांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथून कोकेन आणि चरससारखे प्रतिबंधित पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेलादेखील सामील आहे. जी मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आहे. नागा बाबूने नंतर एक व्हिडीओ जारी करून सांगितलं की, त्यांच्या मुलीचा ड्रग्सशी काहीही संबंध नाही. गायक आणि बिग बॉस रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीजनचे विजेते राहुल सिप्लीगंज याचा देखील अटक केलेल्या लोकांमध्ये समावेश आहे. 12 फेब्रुवारी रोजी जेव्हा हैद्राबाद पोलिसांनी ड्रग्सविरोधात अभियान सुरू केलं होतं, तेव्हा त्याने थीम सॉंग गायलं होतं. पार्टीत अन्य लोकांमध्ये आंध्र प्रदेशातील एक वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आणि राज्यातील एक तेलुगु देशम खासदाराच्या मुलाचा समावेश आहे. तेलंगानात काँग्रेस नेता अंजन कुमार यादव यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीत गेला होता आणि आतापर्यंत आलेली माहिती चुकीची आहे. हे ही वाचा-पुजाऱ्यावर चाकूनं सपासप वार, बचावासाठी 3 महिलांनची आरोपीवर दगडफेक पण... बंजारा हिल्सच्या स्टेशन हाऊस ऑफिसर शिव चंद्राला हैद्राबाद पोलीस कमिश्नर सीवी आनंदने ड्यूटीत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली निलंबित केलं. त्यांच्या ऐवजी टास्क फोर्सचे के. नागेश्वर राव यांना जबाबदारी देण्यात आली आहे. हॉटेलच्या पबची मालक कथित स्वरपात खम्मम जिल्ह्यातील एक माजी खासदाराची मुलगी आहे. हा एक प्रसिद्ध पब आहे. Radisson Blu हॉटेलमध्ये ही छापेमारी अशी वेळी झाली, जेव्हा पोलिसांनी ड्रग्स विरोधातील अभियानाचा वेग वाढवला होता. यासाठी Hyderabad-Narcotics Enforcement Wing चं गठण करण्यात आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bigg boss, Crime news, Drugs, Hyderabad

    पुढील बातम्या